आजकाल भरपूर लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. (Eye Care Tips) नजर कमकुवत झाल्यामुळे झाल्यामुळे लोकांना चश्मा लावावा लागतो. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हेल्थ गुरू हिरा योगी यांनी काही खास व्यायाम सांगितले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Yoga For Eyes Improve Eye Sight Naturally) लोकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. हिरायोगी यांनी आपल्या अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नजर कमकुवत होऊ नये चष्म्याची सवय लागू नये यासाठी कोणते व्यायाम करता येतील आणि त्याचे फायदे सांगितले आहेत.(Yoga For Eyes Improve Eyesight Naturally)
या व्हिडिओमध्ये त्यांनी व्यायाम करताना त्यांनी डोळे उघडून आकाशाकडे पाहण्यास सांगितले आहे. नंतर डोळ्यांच्या समोर अंगठा ठेवून डाव्या बाजूला त्यानंतर खाली घेऊन जाण्यास सांगितले आहे. (Yoga Poses To Practice If You Wish To Improve Your Eye Sight) हा व्यायाम त्यांनी २ ते ३ वेळा करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलंय की डोळ्यांचा चष्मा घालवण्यासाठी टिप्स.
१) डोळे मिचकावणे हा डोळ्यांसाठी उत्तम व्यायाम आहे. हा व्यायाम तुम्ही कधीही कुठेही करू शकता. स्क्रीनकडे सतत न पाहता अधेमध्ये डोळे मिचकावत राहा. ज्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणाही कमी होतो.
२) आवळा डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतो. रोज सकाळी एक चमचा आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.
३) डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटामीन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटामीन सी, व्हिटामीन ई, कॉपर, जिंक यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. याशिवाय पालक, केल यांसारख्या भाज्यांचे सेवन करा. आहारात मांसे, संत्री, लिंबू, दूध, पनीर, पपई यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
शेंगदाणा की सूर्यफुलाचं तेल? स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरणं योग्य, कमी तेलात चमचमीत स्वयंपाक
४) गवतावर अनवाणी पायांनी चाला. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. असं मानलं जातं की गवतावर चालल्याने मेन प्रेशर पॉईंट चांगले राहतात आणि डोळ्याचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.
चोंदलेलं नाक-सुजलेले सायनस आणि खोकलाही होईल कमी, करा ५ उपाय- फुप्फुसांची कार्यक्षमताही वाढेल
५) झोपण्याच्या आधी १ चमचा आवळा पावडर खा ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील, बदाम, बडीशेप, खडीसाखर समान प्रमाणात घेऊन त्याची पावडर बनवा. रोज रात्री झोपण्याच्या आधी २५० मिलीग्राम दूधात १० ग्राम मिश्रण मिसळून याचे सेवन करा यामुळे डोळे चांगले राहण्यास मदत होते.