Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > संध्याकाळी डोळे थकतात, जड झाल्यासारखे वाटतात? त्याची कारणे 5, उपाय काय..

संध्याकाळी डोळे थकतात, जड झाल्यासारखे वाटतात? त्याची कारणे 5, उपाय काय..

Health Tips: दिवसभर फ्रेश वाटत असलं तरी संध्याकाळच्या वेळेला डोळे जड झाल्यासारखे वाटतात, चुरचुरतात... असं का होतं हे जाणून घेणं आणि त्यावर काही उपाय (solution for heavyness in eyes) करणं गरजेचं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 12:29 PM2022-03-05T12:29:56+5:302022-03-05T12:34:19+5:30

Health Tips: दिवसभर फ्रेश वाटत असलं तरी संध्याकाळच्या वेळेला डोळे जड झाल्यासारखे वाटतात, चुरचुरतात... असं का होतं हे जाणून घेणं आणि त्यावर काही उपाय (solution for heavyness in eyes) करणं गरजेचं आहे. 

Eyes tired? these 5 are the main reasons for heavyness in eyes? Read this preventive measures | संध्याकाळी डोळे थकतात, जड झाल्यासारखे वाटतात? त्याची कारणे 5, उपाय काय..

संध्याकाळी डोळे थकतात, जड झाल्यासारखे वाटतात? त्याची कारणे 5, उपाय काय..

Highlightsशारिरीक थकवा जसा आहे, तसाच डोळ्यांचाही असतो. लहान मुलंही अनेकदा डोळे दुखतात, डोळ्यांवर ताण येतो, अशी तक्रार करतात. मुलांच्या या तक्रारीकडेही अजिबात दुर्लक्ष करू नका. 

आजकाल प्रत्येकाचा स्क्रिन टाईम वाढलेला आहे. त्यामुळे डोळ्यांना खूप जास्त थकवा (why eyes get tired?) येतो. प्रत्येकाचा आहारही पोषक असेलच असे नाही.. कधीकधी पोटात काहीतरी ढकलायचं म्हणून आपण अनेक अबरचबर पदार्थ खाऊन घेतो. त्यामुळे मग आपल्या शरीराला जे पाहिजे ते पौष्टिक घटक न मिळाल्याने थकवा येऊ लागतो. हा शारिरीक थकवा जसा आहे, तसाच डोळ्यांचाही असतो. 

 

त्यामुळेच तर डोळ्यांना थकवा नेमका का येतो, काय आपलं चुकतं आणि हा थकवा घालविण्यासाठी कोणते उपचार करणं गरजेचं आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. आजकाल लहान मुलांचाही स्क्रिन टाईम वाढला आहे. त्यामुळे लहान मुलंही अनेकदा डोळे दुखतात, डोळ्यांवर ताण येतो, अशी तक्रार करतात. मुलांच्या या तक्रारीकडेही अजिबात दुर्लक्ष करू नका. 

 

डोळ्यांना थकवा येऊन डोळे जड पडण्यामागची कारणं..
१. अनिद्रेचा त्रास असणं, रात्री लवकर झोप न लागणं..
२. कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असणं
३. चष्म्याचा नंबर बदललेला असणं.
४. खूप जास्त कंम्प्युटर, टीव्ही आणि माेबाईल बघणं आणि ते ही योग्य अंतर न राखता.
५. कमी उजेडात स्क्रिन बघणं किंवा वाचन करणं
६. सायनस किंवा मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनाही डोळे वारंवार जड पडण्याचा, डोळ्यांना थकवा जाणवण्याचा त्रास होतो.

 

डोळ्यांचा थकवा घालविण्याचा उपाय...
१. ॲलर्जी, मायग्रेन किंवा सायनस असा त्रास असल्यास घरगुती उपचार करण्याच्या फंदात न पडता सरळ नेत्र रुग्णालय गाठून डॉक्टरांच सल्ला घ्यावा आणि त्यानुसारच उपचार करावेत.
२. भरपूर पाणी प्या. अंगातलं पाणी कमी होऊन शरीर डिहायड्रेटेड झालं तरी देखील डोळ्यांना थकवा येऊ शकतो.
३. दिवसातून ५ मिनिटे तरी डोळ्यांचा व्यायाम करावा. यामध्ये डोळे वर- खाली, डाव्या आणि उजव्या बाजूला फिरवणे, क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज दिशेने फिरवणे, असे व्यायाम करावे.
४. हिरव्या पालेभाज्या, गाजर आणि व्हिटॅमिन ए असणारे इतर पदार्थ आहारात सामाविष्ट करणे.
५. रात्री ७ ते ८ तासांची झोप घेणे.
६. चष्म्याचा नंबर तपासून घेणे. 


 

Web Title: Eyes tired? these 5 are the main reasons for heavyness in eyes? Read this preventive measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.