Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डोळे खूप चुरचुरतात, लाल होतात? सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळे ‘आळशी’ होण्याचा धोका..

डोळे खूप चुरचुरतात, लाल होतात? सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळे ‘आळशी’ होण्याचा धोका..

सतत डोळ्यासमोर स्क्रिन असल्याने डोळ्यांच्या अनेक समस्या छळू लागल्या आहेत? डोळे सांभाळा, त्यासाठी हे उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 03:45 PM2021-10-02T15:45:25+5:302021-10-02T16:10:05+5:30

सतत डोळ्यासमोर स्क्रिन असल्याने डोळ्यांच्या अनेक समस्या छळू लागल्या आहेत? डोळे सांभाळा, त्यासाठी हे उपाय..

Eyes very crisp, constantly red? Danger of eyes becoming 'lazy' by constantly looking at the screen. | डोळे खूप चुरचुरतात, लाल होतात? सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळे ‘आळशी’ होण्याचा धोका..

डोळे खूप चुरचुरतात, लाल होतात? सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळे ‘आळशी’ होण्याचा धोका..

Highlightsबहुतांश कामे ही स्क्रीनवर असल्यामुळे समस्या डोळ्यांच्या तक्रारी वारंवार उद्भवू लागल्या तर आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो डोळ्याला ताण आल्याने या समस्या निर्माण होतात.

डोळ्यासमोर सतत असणारा मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यांमुळे डोळ्यांना येणारा ताण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या हे सर्रास दिसून येते. डोळे चुरचुरणे, लाल होणे, कोरडे पडणे, डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसायला लागली तर तुमच्या डोळ्यांवर कोणत्या तरी गोष्टीचा ताण येतोय हे वेळीच ओळखा. सध्या आपली बहुतांश कामे ही स्क्रीनवर असल्यामुळे यातील बहुतांश समस्या वारंवार दिसून येत आहेत. दीर्घकाळ एसीमध्ये बसून काम केल्यानेही डोळ्यातील ओलावा कमी होण्याची समस्या उद्भवू शकते. याबरोबरच कमी प्रकाशात काम करणे, एकटक पाहून करावी लागणारी कामे यांमुळेही डोळ्यांच्या अडचणी उद्भवतात. वेगवेगळ्या गोष्टींची अ‍ॅलर्जी, हार्मोनचे बिघडलेले संतुलन डोळ्यांवर ताण येण्याची अशी आणखी काही कारणे असतात. अशाप्रकारे डोळ्यांच्या तक्रारी वारंवार उद्भवू लागल्या तर आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो आणि आपले कामात लक्ष लागत नाही. डोळ्यातील ओलावा टिकवण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय जाणून घेऊ...

( Image : Google)
( Image : Google)

१. जास्तीत जास्त पाणी प्या - डोळ्यांना कोरडेपणाची समस्या असेल तर त्यातील पाण्याचे प्रमाण कमी झालेले असू शकते. डोळ्यातील द्रव पदार्थाचे वंगण योग्य पद्धतीने व्हायचे असल्यास जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होईल अशा पदार्थांचे सेवन कमी करा. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होईल. पाण्याची पातळी जास्त असणाऱ्या फळांचा आहारात समावेश करा.

२. आहारात फॅटी अ‍ॅसिडचा समावेश वाढवा - डोळ्यातील ओलावा वाढवायचा असेल तर ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडस उपयुक्त ठरतात. त्यामुळे हा घटक असलेल्या पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवा, त्याचा तुमचे डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यास निश्चितच फायदा होईल. मासे, आक्रोड, अंडी यांसारख्या घटकांचा आहारात समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.

३. डोळ्यांची उघडझाप करा - कामाच्या नादात आपण एकसलग स्क्रीनकडे पाहत राहतो. कितीतरी वेळा आपण डोळ्यांची उघडझापच केलेली नसते. त्यामुळे डोळे कोरडे पडू शकतात आणि त्यामुळे चुरचुरणे किंवा चिकटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. डोळ्याला ताण आल्याने या समस्या निर्माण होतात. त्यामुळे ठराविक वेळाने डोळे स्क्रीनपासून बाजूला नेऊन २० ते ३० सेकंदांसाठी डोळ्यांची उघडझाप करा.

( Image : Google)
( Image : Google)

४. डोळे पाण्याने धुवा - डोळ्याचे काम चांगले व्हायचे असेल तर त्यातील ओलेपणा टिकून राहण्याची आवश्यकता असते. डोळे पाण्याने धुतल्यास हा ओलेपणा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे दर ठराविक वेळाने डोळे पाण्याने धुतल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

५. सनग्लासेसचा वापर करा - उन्हात बाहेर जाणार असाल तेव्हा आवर्जून सनग्लासेसचा वापर करा. प्रखर उन्हामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते, सनग्लासेसमुळे डोळ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. डोळ्याचा पडदा, आतील भाग, बुबुळ यांचे धूळ, वारा, ऊन्ह या सर्वांपासून रक्षण करण्यासाठी सनग्लासेस हा सर्वोत्तम उपाय आहे.

 

Web Title: Eyes very crisp, constantly red? Danger of eyes becoming 'lazy' by constantly looking at the screen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.