दिवाळी (Diwali) म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फराळ. चिवडा, चकली, शंकरपाळे, करंजी, लाडू आणि मिठाई हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. कितीही मनाला आवर घातलं तरी हे पदार्थ आपण खाल्ल्याशिवाय राहत नाही. कारण वर्षातून एकदा तयार होणारे हे पदार्थ, दिवाळी या सणानिमित्त चविष्ट लागतात. त्यामुळे बरेच जण फराळ आणि मिठाईवर ताव मारतात. पण दुसऱ्या दिवशी अनेकांना ब्लोटिंगचा (Indigestion) त्रास होतो.
कारण मसालेदार, तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर पचनाचा त्रास हा होतोच. शिवाय गॅसेस, अॅसिडिटी (Acidity), पोट फुग्ण्याचा त्रासही होतो. ऐन दिवाळीत बाकीचे लोकं सण साजरा करत असताना जर, आपल्याला घरात पोट धरून बसायचं नसेल तर, ४ घरगुती ड्रिंक्स पिऊन पाहा. यामुळे काही मिनिटात नक्कीच आराम मिळेल(Facing digestive issues post Diwali? Here are special drinks to boost gut health).
धणे, बडीशेप, जिऱ्याचा चहा
जर आपल्याला पोट फुग्ण्याचा त्रास होत असेल तर, धणे-बडीशेप-जिऱ्याचा चहा करून प्या. यासाठी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात प्रत्येकी एक चमचा धणे, जिरे आणि बडीशेप घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद. चहाच्या गाळणीने तयार चहा गाळून घ्या, व दिवसातून २ ते ३ वेळा प्या. शिवाय हलका आहार घ्या.
ओवा
ओवा पचनासाठी उत्तम मानले जाते. ओव्यामध्ये अनेक गुणधर्म आढळतात. यामुळे पोट फुगणे, अपचन, गॅसेसचा त्रास कमी होतो. त्यातील अँटिस्पास्मोडिक व कार्मिनेटिव गुणधर्मांमुळे पोट फुग्ण्याच्या त्रासापासून सुटका होते. यासाठी ओव्याचा चहा पिऊन पाहा, किंवा चिमुटभर ओवा चघळून खा.
जिरे पाणी
जिर्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट गुण भरपूर प्रमाणात आढळतात. यामध्ये कार्मिनेटिव घटक असतात जे पोट फुगणे, अॅसिडिटीपासून आराम देतात. जिरे पाणी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील प्रभावी ठरते. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा, नंतर त्यात २ चमचा जिरे घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. पाणी चहाच्या गाळणीने गाळून घ्या, नंतर त्यात मध मिसळून प्या.
लोकं वजनावरून हिणवतात? निराश होऊ नका, रात्री झोपण्यापूर्वी खा ५ पदार्थ, वजन होईल कमी-दिसाल सुडौल
वेलचीचे पाणी
जर आपल्याला वारंवार ब्लोटिंगचा त्रास होत असेल तर, जेवण्याच्या अर्धा तासानंतर नियमित वेलचीचे पाणी प्या. यातील गुणधर्मांमुळे ब्लोटिंगचा त्रास कमी होतो. आपण त्यात पुदिन्याची पानं देखील मिक्स करू शकता.