Join us   

कोण सांगतं भातामुळे पोट सुटतं? तज्ज्ञ सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत-गैरसमज होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 3:07 PM

Fact Check Does White Rice Makes You Fat And Weight Gain : रोज भात खाल्ला म्हणजे आपण जाड होऊ असा समज अनेकांच्या मनात असतो.

तांदूळ (Rice) भारतातील एक मुख्य अन्नपदार्थांपैकी एक आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपासून सर्वच ठिकाणी भात खाल्ला जातो. भातात बरेच पोषण असते. (Right Way To Eat Rice) भात खाण्यासंबंधित अनेक समज-गैरसमज लोकांच्या मनात असतात.  रोज भात खाल्ला म्हणजे आपण जाड होऊ असा समज अनेकांच्या मनात असतो. भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो यात फार तथ्य नाही. (How To Cook Rice in Correct Way) संशोधकांनी रिसर्च केल्यानंतर काही गोष्टीसमोर आल्या आहेत. 

भात खाल्ल्याने वजन वाढतं की याबाबत इराकमधील संशोधकांनी एक अभ्यास केला केला.  (ref) या अभ्यासात  २१२ लोकांचा समावेश होता. यात दिसून आले की भात खाल्ल्याने सहभागी लोकांचा बीएमआय आणि कंबरेच्या आकारात कोणताही बदल झाला नव्हता. संशोधकांनी  सांगितले की यावर मोठ्या स्केलवर संशोधन करणं गरजेचं आहे. (Rice Eating Hacks)

भात खाल्ल्याने वजन वाढतं का? (Rice Rating Habits And Weight Loss Tips)

भात खाण्यामागचं सगळ्यात मोठा तर्क असतो ते म्हणजे कार्ब्स  खाणं. यात सिंपल कार्ब्स असतात ज्यामुळे वजन वाढ कमी होऊ शकते. कार्ब्स हेल्दी डाएटचा एक भाग आहेत. बेटर हेल्थच्या रिपोर्टनुसार फक्त कार्ब्स खाल्ल्याने तुम्ही लठ्ठ होत नाही तर काही पदार्थं यासाठी कारणीभूत ठरतात.  जर तुम्ही हेल्दी खात असाल पण शारीरिक हालचाल करत नसाल तर वजन वाढू शकतं. फिजिकल एक्टिव्हीजचच्या कमतरतेमुळे लठ्ठपणास कारणीभूत ठरणारे हॉमोन्स वाढतात ज्यामुळे तब्येतीचे नुकसान होऊ शकते. गरजेपेक्षा जास्त सेवन केल्याने तब्येतीच्या इतर समस्याही उद्भवू शकतात. हे नियम भाताच्या सेवनाबाबतही लागू होतात. 

रेड राईस, ब्राऊन राईस यांसारख्या पदार्थांमध्ये पोषण आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. यात खास प्रकारचे प्रोटीन्सही  असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. प्रोटीन, फायबर्स, फॉलेट, मॅन्गनीज, थियामीन, सेलेनियम, नियासिन, आयर्न, व्हिटामीन बी-६, फॉस्फरेस,कॉपर, मॅग्नेशियम, जिंक मोठ्या प्रमाणात असते. 

अंग दुखतं- कॅल्शियम कमी झालंय? उन्हाळ्यात ५ पदार्थ खा; बळकट हाडांसाठी भरपूर कॅल्शियम

सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट पूजा मखीजा सांगतात की भात अशावेळी खाणं जास्त नुकसानकारक ठरतं जेव्हा शरीरात स्टार्चचं प्रमाण वाढतं अशा स्थितीत डायबिटीस आणि पीसीओडीचा धोका वाढतो ज्याळे पॅनक्रियाजचे कामकाज  खराब होते. एक्सोक्राईन फंक्शनवर परिणाम होतो यासाठी भात खाण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा.   

टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सब्यूटी टिप्सआहार योजना