उन्हाळ्याच्या दिवासत तापमान जास्त असल्यानं बरेच लोक थंड पाण्याचे सेवन करतात. उन्हाळ्याच्या दिवसात हायड्रेट राहण्यासाठी लोक जास्तीत जास्त पाणीयुक्त फळं, ज्यूसचे सेवन करतात. नारळपाणी, ज्यूस, सरबत, मिल्क शेक या दिवसात मोठ्या प्रमाणात घेतला जातो. (Summer Health Tips) तज्ज्ञांच्यामते हायड्रेट राहण्यासाठी कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. पण पाणी पिताना पाण्याचं तापमान तपासणंही गरजेचं आहे. पाण्याच्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होतो. लोक उन्हाळ्याच्या दिवसात फ्रिजचं पाणी मोठ्या प्रमाणात पितात. पण उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंड पाणी प्यायल्यास खरंच शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो का, ते समजून घेऊया (Drinking Cold Water Immediately After Coming From a Hot Environment Leads to Life)
वजन कमी करणं कठीण होतं
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी थंड पाण्याचे सेवन करू नये. थंड पाण्यामुळे शरीरातीलअतिरिक्त चरबी जाळणे कठीण होते. फ्रीजच्या पाण्याने शरीरातील चरबी घट्ट होते, त्यामुळे चरबी कमी होण्यात समस्या निर्माण होते आणि वजन कमी होत नाही.
पचनक्रियेवर परिणाम होतो
शरीर कोणतेही पदार्थ सामान्य तापमानात आणते, जे ते पुढील पचनासाठी पाठवते, परंतु अत्यंत कमी तापमानाच्या गोष्टींचे सेवन केल्यास शरीर आपल्या तापमानात आणते. ज्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते आणि अपचन होते. पोटात थंड पाण्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो.
घसा खवखवणं
थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवतो. फ्रीजमधून काढलेले थंड पाणी प्यायल्यानंतर असा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे. दुसरीकडे, जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास कफ तयार होऊ लागतो आणि श्वासोच्छवासाचा मार्ग बंद होतो. त्यामुळे घसा खवखवणे, कफ, सर्दी आणि घसा सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
हार्ट रेटवर परिणाम होतो
थंड पाण्याच्या सेवनानं शरीराच्या हार्ट रेटवर परिणाम होऊ शकतो. अभ्यासानुसार फ्रिजचं पाणी प्यायल्यानं वेगस नर्व स्टिम्यूलेट होते. शरीरातील अनैच्छीक कार्य नियंत्रित करण्याचे काम ही नर्व करते. कमी तापमानाच्या पाण्याचा परिणाम सरळ वेगस नर्व्हवर होतो. यामुळे हार्ट रेट कमी होण्यास मदत होते.
डोकेदुखीची समस्या
उन्हातून आल्यानंतर थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी प्यायल्यास ब्रेन फ्रिज होऊ शकते. थंड पाण्याचे सेवन केल्यानं नसांवर परिणाम होतो. यामुळे मेंदूवरही परिणाम होतो परिणामी डोकेदुखी उद्भवते. सायनस असलेल्या लोकांमध्ये हा आजार समस्या वाढवू शकतो.
फॅक्ट चेक
उन्हातून आल्यानंतर ताबडतोब थंड पाणी प्यायल्याने किंवा आंघोळ केल्याने रक्तवाहिन्या फुटतात किंवा पक्षाघाताचा झटका येतो असे सांगणारा कोणताही सबळ पुरावा नाही. तापमानात अचानक झालेल्या बदलांमुळे आजारांचा कमीत कमी धोका असला तरी, प्राथमिक काळजी घेणं, योग्य हायड्रेशन राखणे आवश्यक आहे,