Join us   

तुम्हीही उभं राहून पाणी पिता? थांबा, उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरावर कसा परिणाम होतो, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 12:50 PM

Drinking Water While Standing Is Bad For You : जेवण केल्यानंतर लगेच जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये. 

तुम्ही अनेकांना असं म्हणताना ऐकलं असेल की उभं राहून पाणी पिणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. उभं राहून पाणी प्यायल्यानं गुडघे खराब होतात. असं अनेकांचे म्हणणे असते. शरीर हेल्दी आणि फिट राहण्यासाठी पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. (Drinking Water While Standing) व्यक्तीच्या शरीरात जवळपास ६० ते ७० टक्के पाणी असते.

शरीराला  पोषक तत्व आणि ऑक्सिजन मिळण्यासाठी पाणी आवश्यक आहे  ओन्ली माय हेल्थच्या स्पेशल फॅक्ट चेक मध्ये उभं राहून पाणी प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो याबाबत डॉक्टर काय सांगतात ते सांगण्यात आलं आहे. (Why Drinking Water While Standing Is Bad For You Drinking Water While Standing Disadvantages)

पाणी पिण्याबाबत काय दावा आहे

पाणी पिण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. अनेकांचे असे म्हणणे असते की जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता  तेव्हा गुडघ्यांमध्ये पाणी जमा होतं आणि गुडघे खराब होण्याची शक्यता असते. उभं राहून पाणी प्यायल्यानं तुमच्या गुडघ्यांमध्ये  वेदना आणि सूज येते.  असं यासाठी म्हटलं जातं कारण उभं राहून पाणी पिणं किडनी, लिव्हर आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी नुकसानकारक ठरू शकते. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. उभं राहून पाणी प्यायल्याने होणाऱ्या नुकसानांबाबत कोणताही रिसर्च समोर आलेला नाही. 

डॉ. रंजन सिन्हा सांगतात की शरीराला पाण्याची फार आवश्यकता असते.  यासाठी पाणी पिताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पाणी जास्त वेगानं पिऊ नये. ज्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते.  इंटरनेटवर हा दावा वेगानं व्हायरल होत आहे. असं म्हटलं जात आहे की उभं राहून पाणी प्यायल्यानं गुडघे खराब होतात, यात काही तथ्य नाही.

जया किशोरींनी सांगितलं सुंदर त्वचेचं सिक्रेट; चेहऱ्याला लावतात किचनमधले हे ३ पदार्थ-चेहऱ्यावर येईल तेज

उभं राहून पाणी प्यायल्यालं सतत पाणी पिण्याची इच्छा होते आणि पचनक्रियाही खराब होते.  उभं राहून पाणी प्यायल्यानं किडनीवरही याचा परिणाम होतो. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने पोट साफ न होणं, मल कडक होणं, अशी लक्षणं दिसून येतात. 

पाणी पिताना या गोष्टींची काळजी घ्या

१) जेवताना किंवा जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नये. 

२) जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या आणि  वेगानं पाणी पिणं टाळा.

३) जेवण केल्यानंतर लगेच जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये. 

४) रनिंग, व्यायाम करताना जास्त पाणी पिऊ नये. 

५) भराभर पाणी न पितात घोट घोट पाणी प्या.

६) झोपून पाणी पिणं टाळायला हवं ज्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. 

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइल