Join us   

डायबिटीस असणाऱ्यांनी आंबा खावा की नाही? आंब्यामुळे वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 12:53 PM

Facts About Having Mangoes For Diabetics Diet tips : आंबा खाण्याचे नेमके काय परीणाम होतात, तो कोणत्या फॉर्ममध्ये खाल्लेला चांगला आणि त्यातून आपल्या शरीराला नेमके कोणते घटक मिळतात याविषयी

आंबा म्हणजे फळांचा राजा, एव्हाना सगळ्यांच्या घरी हा आंबा यायला सुरुवात झाली असेल. पण आंबा खाल्ल्याने वजन वाढतं आणि आपण खूप जाड होऊ, आंब्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा विचारांनी घरात आंबा आणला तरी काही जण मात्र त्याकडे पाहतही नाहीत. वर्षातून फक्त २ महिने मिळणारे हे फळ बहुतांश सर्वांना मनापासून आवडते. पण आरोग्याच्या तक्रारींमुळे आपण तो खाणे टाळतो. मात्र असे मन मारणे सगळ्यांनाच जमते असे नाही. मग वजन वाढण्याची किंवा शुगर वाढण्याची भिती असूनही काही जण अतिशय आवडीने आंबा खातात आणि मग आता आपल्याला काहीतरी होणार असं त्यांना सतत वाटत राहतं (Facts About Having Mangoes For Diabetics Diet tips).  

एका आंब्यामध्ये १ खाकऱ्यापेक्षा कमी कॅलरीज असतात. तर त्यात खाकऱ्यापेक्षा जास्त प्रमाणात फायबर असते. म्हणूनच आंबा हा स्नॅकसाठी किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसंच वर्कआऊट झाल्यानंतर आंबा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. मात्र यासाठीच प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी आंबा खाण्याविषयी काही महत्त्वाची माहिती आपल्याशी शेअर केली आहे. यामध्ये आंबा खाण्याचे नेमके काय परीणाम होतात, तो कोणत्या फॉर्ममध्ये खाल्लेला चांगला आणि त्यातून आपल्या शरीराला नेमके कोणते घटक मिळतात याविषयी अतिशय विस्ताराने माहिती दिली आहे. 

आंब्याचे गुणधर्म 

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, बी ६ मोठ्या प्रमाणात असते. तसेच यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असल्याने पचनक्रिया सुधारण्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

आंबा कसा खावा?

कोणतेही फळ हे शक्यतो आहे त्या रुपातच खाल्लेले शरीरासाठी जास्त चांगले. मात्र आपण आमरस, मँगो मिल्क शेक, मँगो शिरा, मँगो केक, मँगो आईस्क्रीम अशा वेगवेगळ्या रुपात आंबा खातो. पण आंबा असा खाण्यापेक्षा तो कापून खाल्लेला केव्हाही जास्त चांगला. 

डायबिटीस असणाऱ्यांनी आंबा खावा का? 

आंबा हा मिडीयम ग्लायसेमिक इंडेक्स असणारा पदार्थ आहे. आंबा सुपर कॅलरी रीच करुन खाणे योग्य नाही. त्यामुळे आंब्याचे वेगवेगळे गोड पदार्थ न खाता नुसता आंबा आहे त्याच फॉर्ममध्ये खायला हवा. तसंच डायबिटीस असणाऱ्यांनी जेवणानंतर आंबा खायला हवा किंवा मखाणा, सुकामेवा यांसारख्या फायबररीच पदार्थांसोबत आंबा खायला हवा.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआंबाफळेआहार योजना