Join us   

बाजारात बनावट बदामांची विक्री, ‘असे’ झटपट ओळखा केमिकलवाले बदाम! नकली बदामांमुळे कॅन्सरचाही धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:57 AM

How To Identify Fake Almonds : बदाम अस्सल आहेत की बनावट याची चाचणी करण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता.

सध्या दिवाळीची लगबग सर्वांच्याच घरी सुरू आहे. दिवाळीच्या सणाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई, फराळ बनलं जातं.  घरी खाण्यासाठी तर अनेकदा पाहूण्यांना देण्यासाठी फराळ बनवलं जातं. यात बदामाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.  दिवाळीच्या दिवसात ड्रायफ्रुट्सना मोठ्या प्रमाणात मागणी असते.  (How To Check Quality Of Almond) बदामाचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ बनवू शकता.

तुम्ही ज्या बदामांचे सेवन करतात ते खरे आहेत की बनावट हे ओळखण्यासाठी खास युक्ती करून पाहायला हवी.  बदाम एक असा पदार्थ आहे जो पौष्टीक, स्वादीष्ट आणि फायदेशीरही आहे. बदामातील भेसळ तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. (Fake Almonds Being Sold Before Diwali Know One Easy Test To Check Quality Of Almond At Home)

डिटॉक्सप्रीच्या फाऊंडर एंड होलिस्टिक न्युट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांच्यामते बदामाचा रंग आणि चमक वाढवण्यासाठी हानीकारक रसायनांचा वापर केला जातो. हायड्रोजन पेरोक्साईड आणि ब्लिचिंग एजंट्सचा वापर करतात. अशा बनावट बदामाचे सेवन आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. बदामातील भेसळ कशी ओळखावी. असली-नकली बदाम कसे ओळखावेत ते पाहूया. 

पोट फार सुटलं-लठ्ठ दिसता? पेरूच्या पानांचा जादूई उपाय, १ आठवड्यात बघा दिसेल फरक

फेस्टिव्ह सिजनमध्ये बदाम आणि इतर ड्राय फ्रुट्सची मागणी वाढते. जास्त फायदा मिळवण्याच्या नादात विक्रेते बदामात भेसळ करतात. बदामाला जास्त चमकदार आकर्षक बनवण्यासाठी हानीकारक केमिकल्सचा वापर केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साईड आणि ब्लिचिंग एजंट यांसारखी रसायनं वापरली जातात ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. एलर्जी किंवा गंभीर आजारही उद्भवतात.

हायड्रोजन पेरॉक्साईडसारखी रसायनं पोट आणि आतड्यांचा थर खराब करतात ज्यामुळे पोटदुखी, उलटी, मळमळ, जुलाब अशी लक्षणं  जाणवू शकता. दीर्घकाळ असे बदाम खात राहिल्यानं तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते.  असे बदाम खाल्ल्यानं शरीरात हॉर्मोनल संतुलन बिघडते. काही ब्लिचिंग एजेंट शरीरात कॅन्सरचा धोकाही निर्माण करू शकतात. 

प्या २ ग्लास पाणी-वजन भरभर कमी! आहारतज्ज्ञ सांगतात ‘ही’ पाणी पिण्याची युक्ती ठरते कधी इफेक्टिव्ह

बदामाची शुद्धता कशी ओळखावी?

बदाम अस्सल आहेत की बनावट याची चाचणी करण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. यासाठी बदाम घ्या आणि एक वाटी किंवा भांड्यात ठेवा हे भांडं स्वच्छ असायला हवं.  एका वाटीत बदाम पूर्णपणे बुडू द्या त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी घालून रात्रभर भिजू द्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाचं पाणी काढून त्याची सालं काढून टाका. प्राकृतिक बदामांचे साल सहज निघून जाईल आणि साफ, पांढरे बदाम खाता येतील. पाण्याचा रंग तपासून घ्या.  पाण्याचा रंग बदलला तर बदामात केमिकल्सचा वापर केला आहे हे तुम्हाला कळून येईल.

प्या २ ग्लास पाणी-वजन भरभर कमी! आहारतज्ज्ञ सांगतात ‘ही’ पाणी पिण्याची युक्ती ठरते कधी इफेक्टिव्ह

हायड्रोजन पेरोक्साईडचा ब्लिचिंगसाठी वापर केला जातो. हे रसायन पाण्यासोबत रिएक्शन करते. याच कारणामुळे भेसळयुक्त बदाम पाण्यात भिजवल्यास पिवळा रंग सोडतात. जेव्हा हे रसायन पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा  रंग सोडते आणि पाण्याचा रंग बदलतो. ही रासायनिक प्रक्रिया भेसळयुक्त बदाम असल्याचे संकेत आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलफिटनेस टिप्स