थंडीच्या दिवसांत आल्याची मागणी वाढते. या दिवसांत आल्याचा चहा सगळेचजण पितात. आल्याचा चहा प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पण बाजारात मिळणारं भेसळ आलं तुमच्या शरीराचे नुकसान करू शकते. आल्याचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. (Fake Ginger Can Cause Cancer And Other Severe Disease) अन्नाची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आलं खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. (Simple Tips To Check Purity Of Ginger)
न्युट्रिशनिस्ट आणि आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात की आल्यातील गुण आणि पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर यात एंटी इंफ्लेमेटरी एंटी ऑक्सिडेंट्स, डायजेस्टिव्ह, एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी व्हायरल गुण असतात. यात अनेक व्हिटामीन्स, मिनरल्स, बायोएक्टिव्ह कम्पाऊंड्स असतात. आल्याचे फायदे बरेच आहेत.
आल्याचं सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवत नाही. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, इम्यूनिटी वाढून हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होत. तसंच कॅन्सरचा धोका उद्भवत नाही. आल्याचे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील तेव्हा तुम्ही अस्सल आलं खाल. बनावट आलं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.
बाजारात बनावट आलं विकलं जात आहे
मागणी आणि पुरवठा वाढवण्यासाठी बाजारात नकली आल्याचं प्रमाण वाढत आहे. हे आलं खऱ्या आल्याप्रमाणे दिसतं पण यात चव नसते ना वास येत. यातून कोणतेही आरोग्यदायी फायदेही मिळत नाहीत. आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नकली आल्याचे सेवन केल्यानं आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. ज्यामुळे अपचन, अल्सर अशा समस्या उद्भवतात.
बनावट आल्यामुळे किडनी खराब होऊ शकते
बनावट आल्यातील रसायनं सल्फर, ब्लिचिंग एजेंट किंवा कृत्रिम रंग, शरीरात विष पसरवू शकतात. यामुळे लिव्हर, किडनी आणि आतड्यांवर नकारात्मक परिणाम होतो. नकली आल्याचा वापर केल्यास पोटदुखी, गॅस, अपचन यांसारखे विकार उद्भवतात. इतकंच नाही तर रॅशेज,खाज, घश्यात जळजळ यांसारखे त्रास उद्भवतात.
गुडघे- कंबर खूपच दुखते? ५ मिनिटांत करा हेल्दी रेसिपी, चाळिशीनंतरही सांधे दुखणार नाहीत
कॅन्सरचा धोका
दीर्घकाळ नकली आल्याचे सेवन केल्यास हानीकारक रसायनं कॅन्सरचं कारण ठरू शकतात. यातील काही रसायनांमध्ये कॅन्सरकारी घटक असतात. ज्यामुळे श्वसनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बनावट आल्यात पोषक तत्व नसतात. ज्यामुळे इम्यून सिस्टिम कमजोर होते. नकली आल्यातील हानीकारक तत्व ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या ठोक्यांवर प्रतिकूल परिणाम करतात.
आल्याची शुद्धता कशी तपासावी?
जेव्हा तुम्ही कोणत्याही भाजीच्या दुकानातून आलं घेतात तेव्हा त्याचा वास हा नेहमी तिखट असतो. नकली आल्याला कोणताही वास येत नाही. आल्याची साल काढताना सालं हाताला चिकटली किंवा त्याचा वास येत राहीला तर आलं अस्सल आहे.
बॅक ओपन ब्लाऊजचे १० नवीन पॅटर्न, सुंदर-सिंपल पण साडीत दिसाल स्टायलिश-स्मार्ट
पण जर आल्याला वास आला नाही तर आलं नकली आहे. आलं विकत घेताना स्वच्छ आणि चमकदार असेल तर तपासून पाहा. अनेकदा आलं डिटर्जेंट आणि एसिडने धुतलं जातं. यातील रसायनं याला चमकदार बनवतात. एसिडमध्ये भिजवल्यानं आलं विषारी होते आणि तुम्ही आजारी पडू शकता.