Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोरोना-ओमायक्रॉनची भीती, त्यात छळणारी दुखणीखुपणी; आजारी पडायचं नसेल तर नियमित करा 5 गोष्टी

कोरोना-ओमायक्रॉनची भीती, त्यात छळणारी दुखणीखुपणी; आजारी पडायचं नसेल तर नियमित करा 5 गोष्टी

नेहमीच्याच गोष्टी जरा नीट विचार करुन, नेमाने केल्या तर आयुष्य आणखी सुंदर होऊ शकतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 01:21 PM2022-01-01T13:21:57+5:302022-01-01T13:54:52+5:30

नेहमीच्याच गोष्टी जरा नीट विचार करुन, नेमाने केल्या तर आयुष्य आणखी सुंदर होऊ शकतं...

Fear of corona-omycron, tormenting pain in it; If you don't want to get sick, do 5 things regularly | कोरोना-ओमायक्रॉनची भीती, त्यात छळणारी दुखणीखुपणी; आजारी पडायचं नसेल तर नियमित करा 5 गोष्टी

कोरोना-ओमायक्रॉनची भीती, त्यात छळणारी दुखणीखुपणी; आजारी पडायचं नसेल तर नियमित करा 5 गोष्टी

Highlightsगोष्टी नेहमीच्याच पण थोड्या रिव्हाईज करुन पाहूया की...नवीन वर्षात हेल्दी राहायचं तर हे करायला हवं...

नवीन वर्ष (New Year)सुरू झालं की आपण नवनवीन संकल्प करतो. यामध्ये प्रामुख्याने वाढलेलं वजन कमी करणे, व्यायाम करणे, वर्षभरात इतके पैसे कमावणे, या नवीन वस्तू खरेदी करणे यांचा समावेश असतो. पण सध्याच्या काळात कोरोना आणि ओमायक्रॉनची भिती आपल्या सगळ्यांच्याच मनात पुन्हा निर्माण व्हायला लागली आहे. इतर नेहमीची दुखणीखुपणी सोबतीला असतातच. त्यामुळे या परिस्थितीत आपल्याला तंदुरुस्त राहणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या आजारांपासून आणि संसर्गांपासून तब्येत जपायची असेल तर आरोग्य चांगले असायला हवे. तब्येत ठणठणीत असेल तरच आपण आयुष्यातील सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकू. नाहीतर सततच्या तब्येतीच्या कुरबुरींमुळे आपणही वैतागू आणि आपल्या आजुबाजूचेही सगळे वैतागतील. त्यामुळे नवीन वर्षात तुम्हाला हेल्दी आणि आनंदी राहायचे असेल तर काही गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात. यामुळे तुमची तब्येत ठणठणीत राहण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. 

१. मॉर्निंग रुटीन, दिवसाची सुरुवात फ्रेश तर दिवस फ्रेश- 

आपली दिवसाची सुरुवात फ्रेश झाली तर आपण दिवसभर छान आनंदी राहू शकतो. यासाठी मॉर्निंग रुटीन चांगले असणे आवश्यक आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय नसेल तर नवीन वर्षात रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. तसेच उठल्यावर चहा-कॉफी न घेता एखादे ताजे फळ खाऊन दिवसाची सुरूवात करा. 

२. डाएटकडे लक्ष द्याच पण...

आपण हेल्दी खाल्ले पाहिजे हे आपल्याला माहित असते, कळतही असते पण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेकदा आपण चमचमीत आणि जंक फूड खातो. पण खाण्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्यायला हवी. फळं, भाज्या, कडधान्ये, डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात आवर्जून समावेश असायला हवा. याबरोबरच जेवण झाल्यावर काही वेळ चालणे, जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे, आवश्यक तेवढाच आहार घेणे, एकमेकांना विरोधी असणारे पदार्थ सोबत न खाणे अशा काही गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात. त्यामुळे तुमची तब्येत ठणठणीत राहण्यास नक्कीच मदत होईल. 

३. वर्षाचा संकल्प करण्यापेक्षा उद्या कोणता व्यायाम करणार याचा विचार महत्त्वाचा

नवीन वर्षात आपण व्यायाम सुरू करणार असे ठरवतो. नवीन जीम किंवा एखादा योगा क्लास पाहतो. त्यासाठी कपडे, शूज यांची खरेदीही होते. सुरूवातीचे काही दिवस आपण अगदी आनंदाने त्याठिकाणी जातो मात्र ठराविक काळ गेला की पुन्हा आपण व्यायामाला कंटाळा करतो. पण उत्तम तब्येतासाठी व्यायाम गरजेचा असून त्याबाबत टाळाटाळ करणे आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे सुरुवात करतानाच उद्या आपण कोणत्या प्रकारचा व्यायाम करणार इतकेच ठरवा आणि ते फॉलो करा. रोज एकाच दिवसाचे प्लॅनिंग केले तर नकळत तुमचा एक एक दिवस पुढे जाईल आणि तुम्हाला त्याची सवय लागेल. 

४. मन प्रसन्न ठेवण्यासाठी पर्याय शोधा

आपण शरीर निरोगी राहावे म्हणून डाएट, व्यायाम, पुरेशी झोप अशा बऱ्याच गोष्टी करतो. पण त्यासोबतच आपले मनही प्रसन्न राहावे यासाठी दिवसातून एखादी गोष्ट आवर्जून करायला हवी. यामध्ये वाचन, गाणी ऐकणे, एखादा मैदानी खेळ, वाद्य-संगीत-नृत्यकला किंवा चित्रकला यांसारख्या गोष्टींचा समावेश आवर्जून करायला हवा. त्यामुळे आपले मन फ्रेश होण्यास मदत होईल. मन फ्रेश असले की नकळत त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असल्याने मन आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी प्रयत्न करा.  

(Image : Google)
(Image : Google)

५. चांगली संगत कायमच महत्त्वाची 

आपली संगत चांगली असेल तर नकळत आपले आचार-विचार चांगले होतात. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात चांगली संगत जोडण्याचा प्रयत्न करा. आपण ज्या लोकांमध्ये वावरतो त्यानुसार आपले विचार होत असतात. त्यामुळे चांगले मित्र, चांगले ऑफीस आणि चांगली माणसे आजुबाजूला असणे आवश्यक आहे. त्यामुळे नकळतच आपली पातळी वाढण्याची शक्यता असते. माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने तो जितका जास्त माणसांमध्ये राहील तितकी त्याची प्रगती सर्वार्थाने प्रगती होण्याची शक्यता असते.  

Web Title: Fear of corona-omycron, tormenting pain in it; If you don't want to get sick, do 5 things regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.