Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी पोट साफ होत नाही? चपाती खाऊन पोट डब्ब होतं? कणकेत मिसळा '१' पिवळी पावडर; चपात्या होतील मऊ

सकाळी पोट साफ होत नाही? चपाती खाऊन पोट डब्ब होतं? कणकेत मिसळा '१' पिवळी पावडर; चपात्या होतील मऊ

Feel A Lot Of Gas by Eating Chapati; Mix methi seeds in Chapati Flour : चपाती खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर, चपाती 'या' पद्धतीने तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2024 05:42 PM2024-10-13T17:42:33+5:302024-10-13T17:43:47+5:30

Feel A Lot Of Gas by Eating Chapati; Mix methi seeds in Chapati Flour : चपाती खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर, चपाती 'या' पद्धतीने तयार करा

Feel A Lot Of Gas by Eating Chapati; Mix methi seeds in Chapati Flour | सकाळी पोट साफ होत नाही? चपाती खाऊन पोट डब्ब होतं? कणकेत मिसळा '१' पिवळी पावडर; चपात्या होतील मऊ

सकाळी पोट साफ होत नाही? चपाती खाऊन पोट डब्ब होतं? कणकेत मिसळा '१' पिवळी पावडर; चपात्या होतील मऊ

शरीरात होणाऱ्या निम्म्याहून अधिक रोगांचे कारण, मूळ आतड्याच्या खराब आरोग्यामध्ये आहे (Chapati Flour). म्हणूनच उत्तम आरोग्यासाठी आतड्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे (Health Problem). बऱ्याचदा सतत बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास आणि अपचनाचाही त्रास होतो. हेल्दी पदार्थ खाऊनही पचनक्रिया बिघडते.

नियमित आपण पोळी - भाजी खातो. गव्हाच्या पोळीसोबत विविध प्रकारच्या भाज्या आपण खातोच. पण गव्हाची पोळी काहींना पचते तर काहींना पचत नाही. गव्हाची पोळी पचत नसल्यामुळे आपण खाणं टाळतो. जर पोटाचे विकार आणि बद्धकोष्ठतेचा त्रास चपाती खाऊन होऊ नये असे वाटत असेल तर, कणिक मळताना त्यात मेथीच्या दाण्यांची पावडर घाला. पण मेथी दाण्यांचा वापर कणिक मळताना कसा करावा?(Feel A Lot Of Gas by Eating Chapati; Mix methi seeds in Chapati Flour).

बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय

पोळ्या खाऊन बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये म्हणून औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या मेथी दाण्यांचा वापर करून पाहा. मेथीच्या दाण्यांमध्ये आढळणारे सर्व घटक आतड्यांच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात.

चष्म्याचा नंबर वाढतोय, नजर धूसर झाली? आचार्य बालकृष्ण सांगतात खा ' हे ' १ ड्रायफ्रूट रोज

कणिक मळताना मेथी दाण्यांचा वापर कसा करावा?

सगळ्यात आधी मेथी दाण्यांची पावडर तयार करा. एका परातीत गव्हाचं पीठ घ्या, त्यात मेथी दाण्यांची पावडर घालून मिक्स करा. नंतर कणिक मळून घ्या, आणि त्याच्या पोळ्या लाटून घ्या. या चपात्या खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

२ मिनिटांत करा झटपट इन्स्टंट पोहे? १ ट्रिक; नूडल्सपेक्षा झटपट करा पौष्टिक पोहे

मेथी दाण्यांचे शरीराला मिळणारे फायदे

- मेथी दाण्यांची पावडर मिसळून कणिक मळल्याने आणि त्याच्या पोळ्या खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होतात.

- बॅड कोलेस्टेरॉल आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथी दाण्यांच्या पावडरचा वापर करा.

- मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त, फॉस्फरस, जीवनसत्त्वे ए, बी आणि सी, फायबर्स आणि प्रथिने यांसारखे घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. ज्याचा फायदा आरोग्याला होतो. 

Web Title: Feel A Lot Of Gas by Eating Chapati; Mix methi seeds in Chapati Flour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.