Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं? करा 5 उपाय, पावसाळ्यात टाळा पचनाचे आजार

जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं? करा 5 उपाय, पावसाळ्यात टाळा पचनाचे आजार

ब्लोटिंगची (bloating problem after lunch) समस्या महिलांमध्ये प्रामुख्याने असते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि पाळीशी निगडित हार्मोन्समध्ये होणाऱ्या चढ- उतारामुळे निर्माण होणाऱ्या या ब्लोटिंगच्या (remedy on bloating ) समस्यांवर उपाय करता येतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 01:58 PM2022-07-04T13:58:50+5:302022-07-04T14:08:59+5:30

ब्लोटिंगची (bloating problem after lunch) समस्या महिलांमध्ये प्रामुख्याने असते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि पाळीशी निगडित हार्मोन्समध्ये होणाऱ्या चढ- उतारामुळे निर्माण होणाऱ्या या ब्लोटिंगच्या (remedy on bloating ) समस्यांवर उपाय करता येतात. 

Feeling bloated after eating? Make 5 remedies to prevent bloating after eating lunch | जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं? करा 5 उपाय, पावसाळ्यात टाळा पचनाचे आजार

जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं? करा 5 उपाय, पावसाळ्यात टाळा पचनाचे आजार

Highlightsअभ्यास सांगतो की, 4 पैकी 3 महिलांना मासिक पाळी पूर्वी आणि मासिक पाळी सुरु असताना पोट फुगल्यासारखं वाटतं.जेवताना आणि जेवण झाल्यावर काय करता याचाही ब्लोटिंगच्या समस्येशी जवळचा संबंध असतो. ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेराॅन या हार्मोन्समधील चढ उतारांमुळे पचनक्रियेवर परिणाम होवून पोट फुगतं.

जेवल्यानंतर अनेकांना अस्वस्थ वाटतं, पोट फुगल्यासारखं (bloating after lunch)  वाटतं. ब्लोटिंगची समस्या ही महिलांमध्ये प्रामुख्यानं असते. ही समस्या जेवल्यानंतर उद्भवत असली तर त्यामागे केवळ जेवणं हे कारण नसून जेवण कधी केलं, काय खाल्लं, जेवणानंतर काय केलं  या तीन गोष्टींचाही परिणाम होत असतो.  खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (eating habits cause to bloating) , घाईघाईत जेवणे, जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं यामुळे अपचन, पोट फुगणं या समस्या निर्माण होतात. 

Image: Google

महिलांमध्ये या कारणांशिवाय जेवल्यानंतर पोट फुगण्याची समस्या निर्माण होण्याची इतरही कारणं आहेत. ही कारणं बिघडलेली पचन क्रिया आणि पाळीशी निगडित स्वास्थ्य याच्याशी निगडित आहेत. यावर झालेला अभ्यास सांगतो की, 4 पैकी 3  महिलांना मासिक पाळी पूर्वी आणि मासिक पाळी सुरु असताना पोट फुगल्यासारखं वाटतं. मासिक पाळी सुरु होण्यापूर्वी हार्मोन्समध्ये चढ उतार होतात त्यामुळे पाळीपूर्वी पोट फुगल्यासारखं वाटतं. ॲस्ट्रोजन या हार्मोनमुळेही पोटावर सूज येते. ॲस्ट्रोजन हार्मोन जास्त स्रवायला लागलं की शरीरात पाणी साठून राहातं. त्याचाच परिणाम म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटतं. ॲस्ट्रोजनची पातळी वाढली आणि प्रोजेस्टेराॅन या हार्मोनची पातळी कमी झाल्यास पोटावर सूज येते. या हार्मोन्सच्या चढ उताराचा परिणाम पचनावरही होतो. पचनाची क्रिया मंद होते किंवा गतिमान होते. या बदलानं आतड्यात गॅस तयार होतो. तसेच आतडे संवेदनशील होवून पोट फुगल्यासरखं वाटतं.

 

Image: Google

जेवताना घ्या काळजी!

जेवल्यानंतर पोट फुगण्याची समस्या निर्माण होवू नये यासाठी जेवताना आणि जेवल्यानंतर काही नियम आणि पथ्यं पाळायला हवीत. 
1. दुपारी जेवल्यानंतर अनेकांना गोड खाण्याची सवय असते. गोड पदार्थ खाल्ल्यानेही पोट फुगतं. त्यामुळे जेवणानंतर गोड खाणं टाळायला हवं. 

2. जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं ही चुकीची सवय आहे. यामुळे पचनास मदत करणारे विकर पाण्यासोबत वाहून जातात. अन्न पोटात साठून राहातं. पोटातलं अन्न पचवण्यासाठी पोटाला अधिक मेहनत करुन जास्त ॲसिड निर्माण करावं लागतं.  यामुळे जेवणानंतर ॲसिडिटीचा त्रास होणं, पोट फुगणं या समस्या निर्माण होतात. 

3. जेवल्यानंतर झोपल्यास चयापचय क्रिया गोंधळून जाते. ती मंद होते. चयापचय क्रिया मंद झाल्यानं पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे दुपारी जेवल्यानंतर 10 मिनिटं चालणं आवश्यक आहे. 

Image: Google

4. जेवल्यानंतर पोट फुगण्याची समस्या होत असल्यास यावर उपाय म्हणून जेवल्यानंतर थोडा गूळ आणि ओवा एकत्र करुन खावा. हा उपाय जेवल्यानंतर पोट फुगण्याच्या समस्येवर असरदार तर आहेच सोबतच मासिक पाळीमुळे किंवा मेनोपाॅजमुळे ब्लोटिंगची समस्या निर्माण होत असल्यास, इतर त्रास जाणवत असल्यास ते कमी करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. गूळ आणि ओवा एकत्र खाल्ल्यानं अन्न पचण्यास मदत होते. पचनास मदत करणारे विकर वेगानं निर्माण होतात. यामुळे पचन क्रिया सुधारते. 

5. पोट फुगण्याची समस्या टाळण्यासाठी जेवल्यानंतर अर्धं केळ आणि सैंधव मीठ खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. केळ हे पचनास मदत करण्याऱ्या सूक्ष्म जीवांप्रमाणे म्हणजेच प्रोबायोटिकप्रमाणे मदत करतं. तर सैंधव मिठाने पोटातील ॲसिड स्ंतुलित राहून त्यांचं काम सुधारतं. ब्लोटिंगची समस्या घालवण्यासाठी तज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे हे पाच उपाय अवश्य करायला हवेत. 

 

Web Title: Feeling bloated after eating? Make 5 remedies to prevent bloating after eating lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.