बऱ्याचदा असं होतं की एखादा पदार्थ खूप आवडून जातो. त्यामुळे मग अगदी पोटाचा विचार न करता तो मनसोक्त खातो. कारण पोट भरलेलं असतं पण मन मात्र भरलेलं नसतं. कधी कधी सपाटून भूक लागलेली असते आणि त्या नादात आपण खूप जेवतो. जेवणानंतर मग अतिखाण्यामुळे त्रास होऊ लागतो. कधी कधी मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या गराड्यात दोन घास जास्तच खाल्ले जातात आणि नंतर मात्र अस्वस्थ होऊ लागतं. त्यात दिवसा जर थोडं जास्त खाणं झालं तर ते आपल्या कामांमुळे होणाऱ्या हालचालींमुळे पचून जातं. पण रात्री जास्त जेवलं तर खूप त्रास होतो. पोट फुगल्यासारखं होतं. शांत झोपसुद्धा येत नाही (feeling discomfort and restless because of heavy dinner). अशावेळी अवघ्या काही मिनिटांत आराम मिळविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to get rid of indigestion because of heavy food?)
जेवण जास्त झाल्यामुळे अस्वस्थ होत असेल तर...
जेवण जास्त झाल्यामुळे अस्वस्थ होत असेल तर काय उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ wellnesswithmanisha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
अभिषेक बच्चन सांगतो मागच्या आणि पुढच्या पिढीतला मुख्य फरक! म्हणतो आराध्याला वाढवताना खूपच...
यामध्ये योगअभ्यासक असं सांगतात की जर तुम्ही जास्त जेवणामुळे हैराण असाल, पोट फुगल्यासारखं होऊन अस्वस्थ होत असेल तर सगळ्यात आधी एका जागी शांत बसा.
त्यानंतर दोन्ही हातांचे मधले बोट आणि अनामिका ही दोन बोटे दुमडा आणि त्यांची समोरची टोके अंगठ्याच्या समोरच्या टोकावर ठेवून हलकासा दाब द्या. असं करताना तर्जनी आणि करंगळी ताठ ठेवा. याला म्हणतात अपान मुद्रा.
ही मुद्रा करून दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि १० ते १५ मिनिटे शांत बसा. पोटातली अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात कमी झालेली जाणवेल.
तेलाशिवाय पदार्थाला चवच येत नाही असं वाटतं? कमीतकमी तेल घालूनही चवदार स्वयंपाक करण्यासाठी ४ टिप्स
अपान मुद्रा केल्यामुळे पोटाच्या भागाला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते. याशिवाय अपान मुद्रा केल्यामुळे मनावरचा ताण कमी होऊन रिलॅक्स वाटते.