Join us   

पूर्ण झोप घेऊनही सकाळी फ्रेश वाटत नाही? ४ कारणांमुळे आळस, थकवा जाणवू शकतो- बघा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2024 6:51 PM

Why Do We Feel Sleepy And Tired After Complete Sleep In Night: रात्रीची झोप पूर्ण होऊनही अंगातून आळस जातच नसेल तर त्यासाठी ही काही कारणं असू शकतात.. (Feeling Tired and sleepy After Waking Up?)

ठळक मुद्दे अंगात लोह कमी असेल तर त्यामुळेही तुम्हाला कायम थकल्यासारखे वाटू शकते. त्याचा तुमच्या मूडवरही परिणाम होऊ शकतो.

जेव्हा आपली झोप अपूरी होते, पुरेसा आराम मिळत नाही, तेव्हा थकल्यासारखे वाटते. सगळं अंग आळसावून गेल्यासारखं होतं. अशा वेळी आपण हातातली सगळी कामं टाकून आधी आराम केला पाहिजे. पण काही लोकांच्या बाबतीत असं हाेतं की ते रात्रीची पूर्ण झोप घेतात, तरीही दुसऱ्यादिवशी उठल्यानंतर त्यांना फ्रेश, उत्साही वाटत नाही. अंगातून आळस जात नाही. असं वारंवार होत असेल तर त्यामागे ५ कारणं असू शकतात, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत (Why Do We Feel Sleepy And Tired After Complete Sleep In Night). या कारणांकडे दुर्लक्ष करणं तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकतं. बघा तुमचंही तसंच होेत नाही ना? (Feeling Tired and sleepy After Waking Up?)

 

झोप पूर्ण होऊनही अंगातून आळस का जात नाही?

याविषयी आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ यांनी ४ कारणं सांगितली आहेत. ती नेमकी कोणती याविषयीची माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे.

श्रावणी सोमवार विशेष- उपवासामुळे ॲसिडीटी वाढते? ३ गोष्टी करा- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही 

१. डिहायड्रेशन जर तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी पित नसाल तर त्याचाही परिणाम तुमच्या झोपेवर होतो. पुरेसं पाणी प्यायलं नाही तर शरीरात अमिनो ॲसिड, मेलॅटोनिन हे हार्मोन्स पुरेशा प्रमाणात तयार हाेत नाहीत. त्याचा झोपेवर परिणाम हाेतो आणि मग पुरेशी झोप घेऊनही अंगातून आळस जात नाही.

पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स वाढले? खोबऱ्याचा करा खास वापर- चेहरा होईल स्वच्छ- नितळ

२. स्क्रिन अनेक लोकांच्या बाबतीत हे मुख्य कारण आहे. रात्री झोपण्यापुर्वी जर तुम्ही हातात मोबाईल घेत असाल तर त्यामुळे तुमचा मेंदू अधिक जागरुक होतो आणि त्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होते.

 

३. थायरॉईड जर तुमच्या शरीरातील थायरॉईड हार्मोनचे संतुलन बिघडले असेल तरीही त्याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. चयापचय क्रियेवरही त्याचा परिणाम होतो. यामुळे रात्री शांत झोप न लागणे, झोप लागली तरी दुसऱ्यादिवशी सकाळी अंगात आळस असल्यासारखा जाणवणे असा त्रास होतो.

श्रीजेश मानलं तुला! हॉकीस्टीकवर बायकोचं नाव; म्हणतो- जगानं मला ‘तिचा नवरा’ म्हणून ओळखावं कारण..

४. लोहाची कमतरता

अंगात लोह कमी असेल तर त्यामुळेही तुम्हाला कायम थकल्यासारखे वाटू शकते. त्याचा तुमच्या मूडवरही परिणाम होऊ शकतो. हे तुमच्या थकव्याचे, आळसाचे कारण असेल तर त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्यावेत. तसेच आहारातही लोहयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात असावे.   

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स