हिवाळा प्रत्येकाला आवडत जरी असला तरी या दिवसात त्वचा कोरडी, निस्तेज, काळपट पडते. केसांची निगा राखणं कठीण होते. मुख्य म्हणजे हात - पाय प्रचंड थंडगार पडतात. काहींचे पाय इतके थंड पडतात की, मोजे घालून देखील त्रास कमी होत नाही. हे असे का होते? कधीकधी ॲनिमिया, रेस्टलेस लेग सिंड्रोम, , मधुमेह, हायपोथायरॉईडीझम आणि हायपोथर्मिया यांसारख्या समस्यांमुळे पायांचे तळवे थंड पडतात. यावर उपाय काय?
पाय गरम पाण्याने धुवा
थंड पायांना गरम करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्यात मीठ घाला आणि पाय त्यात काही वेळासाठी बुडवून ठेवा. पाय गरम पाण्यात बुडवून ठेवल्याने पायांमधील ब्लड सर्कुलेशन योग्यरित्या होते. यासह पायांना चांगला शेक मिळतो.
गरम तेलाने मसाज
पायांना उबदार ठेवण्यासाठी तेल मदत करेल. या नैसर्गिक उपचाराने पायांना आराम मिळेल. पायांना गरम तेलाने मालिश द्या. यासाठी आपण मोहरी किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. सर्वप्रथम तळहातावर तेलाचे काही थेंब घेऊन तळवे आणि संपूर्ण पायांचा मसाज करा. यामुळे रक्त प्रवाह वाढेल, ज्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुधारेल. अशा प्रकारे पाय उबदार राहतील.
आयर्न आणि विटामिन बी समृद्ध आहाराचे सेवन करा
रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे पाय थंड पडतात. लोहयुक्त अन्नाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. व्हिटॅमिन बी २ किंवा १२ च्या सेवनाने शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन योग्य प्रकारे होईल. असे केल्याने पायांची समस्या दूर होऊ शकेल.