फक्त भारतातचं नाही तर जगभरात महिलांसंदर्भात असंख्य अनिष्ट रुढी परंपरा आजही सुरू आहेत.(Female genital mutilation) महिलांच्या आरोग्यासंदर्भात तर जास्तच. निती नियम, परंपरा, आणि महिलांना देहसुख कमी लाभावे किंवा त्यांना लैंगिक सुखाची इच्छा कमीतकमी असावी म्हणूनही काही गोष्टी आजही जगभर सुरु आहेत. 'महीलांची खतना'(Female genital mutilation) हा एक अत्यंत भयंकर असा विधी बऱ्याच धर्मांत केला जातो. ‘शुद्धीकरणाचा विधी’ म्हणत अनेकजण त्याचं समर्थनही करतात. मात्र महिला आणि मुलींसाठी ते अत्यंद वेदनादायी असते.
जागतिक आरोग्य संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार हा विधी जास्त करुन आफ्रिका व आशिया खंडातील अनेक देशांत केला जातो. १५ वर्षाच्याखालील मुलींवर शस्त्रक्रीया केली जाते.(Female genital mutilation) खतना करतात म्हणजे महिलेच्या योनीतील क्लिटोरिस नावाचा भाग ब्लेडने किंवा धारदार अवजाराने कापून टाकतात आणि योनीला टाके घालतात. नवजात मुलीपासून ते १५ वर्षांपर्यंतच्या काळात खतना करतात. म्हणजेच मुलीचे लैंगिक आयुष्य सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार करण्यत येतो. ही प्रथा मानवी अधिकारांविरुद्ध आहे. जननेंद्रियांना या विधीमुळे इजा पोहचते. मासिकपाळीवर याचा परिणाम होतो. मुलींना असह्य वेदनांमधून जावे लागते,गर्भधारणेवरही दुष्परिणाम होतात. अनेक स्रियांना मातृत्वाला मुकावे लागते, सतत ताप येतो. विविध संसर्ग होतात, अनेक आजार होतात. एवढेच नव्हे तर काही वेळेस मुलींचा मृत्यूदेखील होतो. डब्ल्यूएचओने सांगितल्यानुसार, प्रतिवर्षी सुमारे 3 दशलक्ष मुलींचा जीव या विधीमुळे धोक्यात येतो.
सुजाण व सुशिक्षित लोकसुद्धा समाज वाळीत टाकेल या भीतीने प्रथा पाळतात. २००८ साली WHO ने WHA61 अंतर्गत महिला खतना विरुद्ध नियमावली तयार केली.(Female genital mutilation) आरोग्य केंद्रांना खातना करणारे आढळल्यास त्या विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते.२०३० पर्यंत ही प्रथा मुळापासून नष्ट करण्याचा निर्धार WHO ने केला आहे. जागतिक स्तरावर वैद्यकीय कर्मचारी देखील प्रथा निर्मुलनासाठी मदत करत आहेत. जनजागृतीसाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन हा मुलींचा अधिकार आहे.