रक्त शरीरासाठी एखाद्या इंधनाप्रमाणे काम करते. यात आरबीस, डब्ल्यूबीसी यांसारखे अनेक कम्पाऊंड्स असतात. डायजेशननंतरही टॉक्सिन्स रक्तात मिसळतात. यामुळे रक्त खराब होऊ लागतं. किडनी रक्त प्युरीफाय करण्याचे काम करते. असे अनेक पदार्थ आहे ज्याला किडनीद्वारे प्रोसेस्ड केले जाते. याच्या मदतीने रक्त प्युरिफिकेशन चांगले होते. रक्त साफ करण्यासाठी तुम्ही या खास चटणीचे सेवन करू शकतात. लोकांच्या म्हणण्यानुसार बडिशेपेची चटणी खाल्ल्याने ब्लड फिल्टर होऊ लागते. बडिशेपेची चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Fennel Seeds Chutney Recipes For Blood Purification And Remove Toxin)
ब्लड प्युरिफिकेशन
टॉक्सिन्स बाहेर न पडल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.याशिवाय शरीराच्या इतर अवयवांना नुकसान पोहोचतं. हे साफ करण्यासाठी बडिशेपीचे चटणी खा. यामुळे टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होईल आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले राहील. संशोधनानुसार बडिशोप डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. (Ref) यातील कर्मिनेटिव्ह गुण गॅस, अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. जेवल्यानंतर बडिशेपेच्या चटणीचे सेवन केल्याने अन्न पचण्यासही मदत होते.
सर्दी खोकल्यापासून आराम
बडिशोपेच्या चटणीत एंटीइंफ्लामेटरी आणि एंटी ऑक्सिडेंट्स गुण असतात. ज्यामुळे सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. कफ पातळ होतात आणि घसा खवखवणं बंद करा. घशाच्या वेदनांपासूनही आराम मिळतो.
वजन कमी करण्यास मदत होते
बडिशोपच्या चटणीत कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो. नियमित याचे सेवन केल्यानं कॅलरीजचे प्रमाण कमी होते. ही चटणी खाल्ल्ल्याने तोंडाला दुर्गंध येत नाही. हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. २ चमचे बडिशोप व्यवस्थित भाजून घ्या, जेणेकरून त्याचा चव आणि गंध दोन्ही वाढेल.
बडिशोपेची चटणी कशी करायची ?
मिक्सरच्या भांड्यात १ वाटी बडिशोप, १ कप कोथिंबीर, १ ते २ हिरव्या मिरच्या, १ छोटं आलं, १ मोठा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी घाला. हे सर्व साहित्य वाटून चटणी तयार करून घ्या. तयार चटणी एका भांड्यात काढून जेवणाबरोबर सर्व्ह करा.