मेथी दाणे (Fenugreek Seeds) असो किंवा मेथीची भाजी, मेथी आरोग्यासाठी फायदेशीर असते. मेथीच्या दाण्यांमध्ये बीटा-ग्लुकोसिन असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मेथी दाण्यांमध्ये फायबर असते. ज्यामुळे पचन सुधारते, व वजनही कमी होण्यास मदत होते.
अनेक लोकं मेथी दाण्याचे पाणी पितात. याच्या सेवनाने हृदय निरोगी राहण्यास, शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास, यासह मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण आपल्याला मेथी दाणे आणि मध एकत्र करून खाण्याचे फायदे ठाऊक आहे का? न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी मेथी दाणे आणि मध खाण्याचे फायदे सांगितले आहे(Fenugreek Seeds and Honey For Weight Loss).
वेट लॉससाठी होईल मदत
मेथी आणि मध एकत्र खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. मेथीमध्ये फायबर असते, मध पोटाला निरोगी ठेवते आणि म्हणूनच ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
तूप तब्येतीसाठी आवश्यक खरे, पण ताकद हवी म्हणून रोज रोज भरपूर तूप खात असाल तर..
कण्ट्रोलमध्ये राहील मधुमेह
मेथी दाणे आणि मध यांचे मिश्रण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मेथी आणि मध मेधुमेहीग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
हृदयासाठी उत्तम
मेथीच्या दाण्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. शिवाय मधाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पचनक्रिया होते सुरळीत
मेथी आणि मध पचनाच्या निगडीत समस्या सोडवण्यास मदत करतात. मध खाल्ल्याने पोटाचे विकार होत नाही. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
साबुदाणा खाल्ल्याने वजन कमी होते की वाढते? साबुदाणा खाण्याची योग्य पद्धत कोणती?
मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर
मध आणि मेथीचे सेवन केल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो. याशिवाय, त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.