Join us   

पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो? ४ उपाय, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी -पोट होईल साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 1:29 PM

Five Fruits with High Fiber to Treat Constipation : अनेकदा मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि पोट साफ व्हायला त्रास होतो.

गॅस, कॉन्स्टिपेशन होणं ही एक गंभीर समस्या आहे. (Constipation Home Remedies) व्यायामाची कमतरता, पाणी कमी पिणं, औषधांचे अति सेवन यामुळे पोट साफ न होण्याची समस्या उद्भवते. आहारात फायबर्सची कमतरता असल्यामुळे पोटाचे त्रास उद्भवतात. ज्यामुळे आतड्यांच्या आतून व्यवस्थित अन्न जात नाही. गॅस, कॉन्स्टिपेशनचा त्रास असल्यास लोकांना टॉयलेटमध्ये  फार जोर लावावा लागतो. (Five fruits with high fiber to treat constipation)

ज्यामुळे मुळव्याधही होऊ शकतो. म्हणूनच आहारात फायबर्सचे प्रमाण वाढवायला हवं. अनेकदा मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि पोट साफ व्हायला त्रास होतो. डायटिशियन मानसी यांनी ५ फळं सांगितली आहेत. ज्यामुळे पोटाच्या समस्या मुळापासून नष्ट होऊ शकतात. (Five fruits with high fiber to treat constipation)

केळी

केळी एक हाय कार्ब्स फूड आहे ज्यामुळे एनर्जी मिळते. मसल्स बिल्डींगसाठी एक उत्तम पर्याय  आहे. केळ्याच्या सेवनाने तुम्हाला व्हिटामीन्स, मिनरल्स मिळतात इतकंच नाही तर १०० ग्राम केळी खाऊन ३.१ ग्राम फायबर्स मिळतात. ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

ओटी पोट लटकतंय, फिगर पूर्ण बिघडली? रोज सकाळी ४ गोष्टी करा, आपोआप स्लिम-फिट दिसाल

ड्राय फ्रुट्स

ड्राय फ्रुट्स फक्त मेंदूसाठी फायदेशीर नसतात तर पोटासाठीही याचे अनेक फायदे आहेत. ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्यास गंभीर आजारांपासून बचाव होतो. हे एक नैसर्गिक लॅक्सेटिव्ह आहे. जे सोल्यूबल फायबर देते. अंजीर, बदाम, काजू, पिस्ता या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

पिअर

पिअर हे एक टेस्टी फळ आहे. यामुळे कॉन्सिपेशनचा त्रास कमी होतो. १०० ग्राम पिअरमध्ये ५ ग्राम फायबर्स असतात. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते.  ज्यामुळे हिडायड्रेशन कमी होते. हे १ लो कॅलरी फूड आहे.  ज्यात व्हिटामीन्स आणि एंटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

रोज सकाळी न चुकता प्या लिंबू पाणी; ७ फायदे, वजन घटेल, चेहरा दिसेल टवटवीत-ग्लोईंग

किव्ही

इम्यूनिटी वाढवण्यासाठी किव्ही खायला हवं. यात व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. हे एक आंबट-गोड फळ आहे. ज्यामुळे मल सैल होण्यास मदत होते आणि टॉयलेटमध्ये जास्त जोर लावावा लागत नाही. १०० ग्राम किव्ही खाल्ल्याने २.५ ग्राम फायबर्स मिळतात. हे फळ आतड्यांची स्वच्छता करून पोट साफ होण्यास मदत करते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स