Join us   

कॅल्शियम हवं पण दूध-दही आवडत नाही? ५ पदार्थ खा- कॅल्शियम मिळेल भरपूर, फॅक्चरचा टळेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 11:47 AM

Top 5 Veg Foods For Calcium (calcium milavnyasathi kay khave) : शरीरात जवळपास ९९ टक्के कॅल्शियम हाडांमध्ये जमा असते. १ टक्का कॅल्शियम मांसपेशींमध्ये असते.

रोजची दगदग-कामासाठी धापवळ यामुळे शरीराला थकवा येतो. थकवा कमी करण्यासाठी शरीराला आयर्न, प्रोटीन्स यांसारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. (Calcium kashatun milte) कॅल्शियम असे एक मिनरल आहे हे हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त ब्लड क्लॉट, नर्व्हस सिस्टीमध्ये सुधारणा, हार्ट रेट नॉर्मल करण्यासाठीही साहाय्यक ठरते. (Veg Foods For Calcium) शरीरात जवळपास ९९ टक्के कॅल्शियम हाडांमध्ये जमा असते. १ टक्का कॅल्शियम मांसपेशींमध्ये असते. (Five Leafy Vegetables in Your Diet to Beat Calcium Deficiency And Make Your Bone Strong)

शरीरात कॅल्शियम  कमी असेल तर काय होते?

कॅल्शियमच्या  कमतरतेने हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपेरोसिससारखो आजार उद्भवू शकतात. इतकंच नाही तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांच्या समस्या, रक्त कमी होणं, नखं कमकुवत पडणं, एकाग्रता कमी होणं असे त्रास उद्भवतात.  कॅल्शियम दूधासह इतर डेअरी उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. पण रोजच्या जेवणातील भाज्याही तुम्हाला कॅल्शियम देऊ शकतात. बऱ्याच जणांना हे दूध प्यायलाही आवडत नाही. हिवाळ्याच्या  दिवसांत कॅल्शियमयक्त  भाज्यांचा समावेश केल्यास हाडांचे त्रास टळतील, सांधेदुखीच्या समस्या उद्भवणार नाहीत. 

हार्वर्ड हेल्थनुसार १९ ते ५० वर्षवयोगटातील महिलांना रोज १००० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. तर ५० वर्षांपुढील वयोगटातील महिलांना १२०० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. १९ ते ५० वर्ष वयोगटातील पुरूषांना  १००० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.  फक्त डेअरी प्रोडक्ट्सस नाही तर शेंगा, ड्रायफ्रुट्स आणि स्टार्चयुक्त भाज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. 

केल आणि ब्रोकोली

केल आणि ब्रोकोली कॅल्शियमच्या उत्तम स्त्रोतांपैकी एक आहे.  एक कप कच्च्या ब्रोकोलीमध्ये ४३ मिलीग्राम कॅल्शियम असते तर १ कप  केलमध्ये ५३ मिलीग्राम कॅल्शियम असते.

बारीक व्हायचंय पण डाएट नको वाटतं? जेवणात 'ही' डाळ खा; भराभर घटेल पोटाची चरबी-स्लिम दिसाल

कोलार्ड ग्रीन्स

कोलार्ड ग्रीन्समध्ये  जवळपास ३५ मिलिग्राम कॅल्शियम असते.  सॅलेडच्या स्वरूपात तुम्ही ही  भाजी खाऊ शकता. यात आयर्नचे प्रमाणही भरपूर असते.

भेंडी

भेंडीची भाजी अनेकांना आवडत नाही पण ही भाजी कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. भेंडीच्या भाजीत जवळपास ६५ मिलीग्राम कॅल्शियम असते. 

पोट, मांड्याची चरबी खूपच सुटलीये? रिकाम्या पोटी 'हा' पदार्थ घ्या, वजन घटेल-२८ ची होईल कंबर

किव्ही

हाय कॅल्शियम फूड्समध्ये किव्ही सगळ्यात वर आहे. नियमित किव्ही खाल्ल्याने शरीराला कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही आणि हाडं मजबूत राहतात. यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. 

बेरीज

जांभूळ, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. तुम्ही या भाज्या सॅलेडच्या स्वरूपात खाऊ शकता. यात २० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅल्शियम असते. 

टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स