Join us   

रात्री कमी जेवल्याने खरंच पोट कमी होतं का ? ५ चुका करणं टाळा; ना जीम, ना डाएट फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 3:31 PM

Five things not to do after a meal (Health Tips) : झोपण्याच्या  कमीत कमी २ तास आधी रात्रीचे जेवण करा. जेवल्यानंतर लगेच झोपलात तर अन्न व्यवस्थित पचणार नाही.

वजन कमी करणं कमी करणं किंवा वजन मेंटेन ठेवणं या दोन्ही गोष्टी कठीण आहेत. अनेकदा आपण जाड झालो आहोत असं वाटतं किंवा खरंच वजन वाढू लागते. (Ratriche jevan kase karave) याचं कारण रोजच्या काही लहान- मोठ्या चुका असू शकतात ज्यामुळे शरीर फिट राहत नाही. जेवताना  काही चुका केल्यास तुमचं वजन वाढू शकतं. या चुका तुम्हीही करत असाल तर वेळीच सांभाळा. (Things you must never do after having a meal) रात्रीच्या जेवणासंदर्भात महत्वाच्या टिप्स पाहूया.

१) झोपण्याच्या  कमीत कमी २ तास आधी रात्रीचे जेवण करा.  जेवल्यानंतर लगेच जेवलात तर अन्न व्यवस्थित पचणार नाही. गॅस, ब्लोटींग आणि वजन वाढण्यासह इतर समस्याही उद्भवू शकतात. 

२) जेवल्यानंतर गोड खाण्याचे क्रेव्हींग्स अनेकांना होतात. स्नॅक्स किंवा काहीतरी गोड खायचे असल्यास फळं खा. कारण रात्रीच्या वेळी काहीही गोड खाल्ल्यामुळे वजन वाढू शकतं.  जेवल्यानंतर गोड खाल्ल्याने तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. 

३) डिनर केल्यानंतर लगेच नाचणं, व्यायाम करणं यांसारख्या एक्टिव्हिज करू नका.  तुम्ही अशा  फिजिकल एक्टिव्हीज केल्यामुळे अस्वस्थ वाटू शकता. पोटात वेदना जाणवतात अन्न पचायला त्रास होतो.  यामुळे शरीरातील पोषक तत्व पुरेपूर मिळत नाही आणि हाय कॅलरीजमुळे वजनावर परिणाम होतो. 

४) प्रत्येकाच्या शरीराचे बायोलॉजिकल क्लॉक असते. यानुसार शरीर काम  करते रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत जेवणे ही सगळ्यात प्रभावी पद्धत मानली दाते. बरेचजण १० ते ११ दरम्यान जेवतात असं केल्याने वजनावर परिणाम होऊ शकतो. 

पोटावर कपडे घट्ट होतात-शर्टाची बटन्स लागत नाही? ५ गोष्टी करा-पोट कमी होईल; मेंटेन राहाल

५) रात्रीच्या जेवणानंतर १० ते १५ मिनिटं चालायला हवं. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं फार महत्वाचे अससते पण जेवल्यानंतर लगेचच जास्त पाणी पिऊ नका हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते अन्न पचायला कमीत कमी २ तासांचा वेळ द्या. त्याआधीच तुम्ही पाणी पित असाल तर डायजेशनवर चुकीचा परिणाम होतो. म्हणून जेवल्यानंतर कमीत कमी ४५ ते ६० मिनिटांनंतरच पाणी प्या किंवा जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या. 

५८ व्या वर्षीही हॉट-फिट दिसणारे मिलिंद सोमण रोज खातात तरी काय? पाहा साधा डाएट प्लॅन...

 जेवल्यानंतर चहा किंवा कॉफी पिणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. थकवा घालवण्यासाठी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी २ वेळा  कॉफिचे सेवन करू शकता. पण जेवल्यानंतर कॅफेनचे पदार्थ घेणं टाळा यामुळे पचनक्रिया खराब होते आणि शरीर व्यवस्थित अन्न डायजेस्ट करू शकत नाही.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स