Join us   

झोप यायला वेळ लागतो-सतत विचार येतात? डॉ. नेने सांगतात ५ खास उपाय, पडल्याबरोबर ढाराढूर झोपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 7:03 PM

5 Tips To Better Sleep : तुम्ही जास्त प्रमाणात चहा प्यायलात तर तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते. म्हणून कमीत कमी प्रमाणात कॅफेनचे सेवन करा

शरीराला कितीही थकवा आला असेल तरी रात्री लवकर झोप येत नाही, झोप लागली तरी मध्ये मध्ये जाग येते अशी अनेकांची तक्रार असते.  शांत झोप  येणं हे सुद्धा कठीण झालंय. काहींजणांच्या डोक्यात वेगवेगळे विचार फिरत असतात तर काहीजण झोपताना ताण घेतात. (5 Tips To Better Sleep) झोप न झाल्यामुळे दिवसभर थकवा येणं, एकाग्रता न राहणं, अशक्तपणा, दिवसा झोप येणं, हॉर्मोनल इम्बेलेंस अशा समस्या उद्भवू शकतात. प्रसिद्ध सेलिब्रिटी डॉक्टर डॉ. श्रीराम नेने म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेचे पती यांनी रात्री शांत झोप येण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. (Five Tips To Improve Your Sleep Quality By Dr. Shriram Nene)

१) झोपायला जाण्याच्या ३० मिनिटं आधी स्क्रीन पाहणं टाळा

अनेकांना  झोपताना हातात फोन घेऊन तासनतास वापरण्याची सवय असते. यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते आणि डोळेसुद्धा कमकुवत होऊ शकतात. झोपायला जाण्याच्या  ३० मिनिटं आधी स्क्रीनचा वापर टाळा. ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट, व्यवस्थित दिसेल. 

2) झोपण्याची एक आरामदायक दिनचर्या बनवा

स्लिप फाऊंडेशन ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार झोपण्याचे एक रूटीन बनवा. झोपण्याच्या आधी जड जेवण आणि अल्कोहोलयुक्त पेय, एसिड रिफ्लेक्सयुक्त पदार्थांचे सेवन करू नका. ज्यामुळे तुमची झोप होऊ शकते. शास्त्रज्ञांच्यामते अंघोळीच्या एक तास आधी कोमट पाण्यानं अंघोळ करा.  संगीत एक रिलॅक्सेशन टूल आहे. झोपताना तुम्ही शांत संगीत ऐकू शकता. ज्यामुळे  डोक्याला विश्रांती मिळेल आणि चिंतापासून दूर राहाल.

4) खोलीचे तापमान आणि वातावरण

तुम्ही ज्या खोलीत झोपता तिथे शांतता असेल असं पाहा. कारण जास्त आवाजाच्या ठिकाणी तुम्हाला झोपच येणार नाही. रूममध्ये गारवा असू द्या. एसी, पंखा ऑन करून नंतर काही वेळानं झोपायला जा. एसी नसल्यास खिडक्या थोड्यावेळासाठी उघड्या ठेवा जेणेकरून रूम गार राहील.

5) दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर कॅफेन कमी प्रमाणात घ्या. 

तुम्ही जास्त प्रमाणात चहा प्यायलात तर तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते. म्हणून कमीत कमी प्रमाणात कॅफेनचे सेवन करा. तुम्ही जास्त प्रमाणात चहा कॉफी घेतलात तर रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. सकाळी एकदा चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर संध्याकाळी 6 पर्यंत चहा किंवा कॉफी घ्या. जास्त उशीरा चहा, कॉफी घेतल्यानं लवकर झोप लागणार नाही.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स