Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तोंडी लावण्यासाठी रोज फक्त अर्धा चमचा आळशीची चटणी खा, कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर खास उपाय

तोंडी लावण्यासाठी रोज फक्त अर्धा चमचा आळशीची चटणी खा, कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर खास उपाय

Flax Seeds Chutney Benefits : आळशीच्या बीया कोलेस्टेरॉल कमी करतात याशिवाय हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:04 PM2024-05-29T16:04:22+5:302024-05-29T17:05:37+5:30

Flax Seeds Chutney Benefits : आळशीच्या बीया कोलेस्टेरॉल कमी करतात याशिवाय हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात.

Flax Seeds Chutney Benefits : Eat One Spoon Of Flax Seeds Chutney in A Day For Improve Immunity | तोंडी लावण्यासाठी रोज फक्त अर्धा चमचा आळशीची चटणी खा, कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर खास उपाय

तोंडी लावण्यासाठी रोज फक्त अर्धा चमचा आळशीची चटणी खा, कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर खास उपाय

जेवणाची चव वाढवण्यासाठी आळशीच्या बीयांची चटणी फायदेशीर ठरते. (Flax Seeds) खासकरून जेव्हा हृदयाच्या आरोग्याशी संबंध येतो तेव्हा चटणी बरीच फायदेशीर ठरते. (Health Tips) आळशीच्या बीया अनेक गुणांनी परिपूर्ण असतात.  यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात.  आळशीच्या बीया कोलेस्टेरॉल कमी करतात याशिवाय हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात. आपल्या आहारात चटणीचा समावेश करून तुम्ही पोषक तत्वांची कमतरता भरून काढू शकता. (Eat One Spoon Of Flax Seeds Chutney in A Day For Improve Immunity)

पौष्टीकतेने परिपूर्ण असलेल्या आळशीच्या चटणीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. आळशीच्या चटणीची चव अप्रतिम असते. आरोग्याच्या दृष्टीने आळशीच्या बीयांचे अनेक  फायदे आहेत. आळशीच्या चटणीचा आहारात समावेश करून तुम्ही गंभीर आजारांपासून सुटका मिळवू शकता. आळशीची चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. 

कार्यालयात आता महिलांना मासिक पाळीची सुटी जाहीर, महिला आता हक्काने सुटी घेऊ शकणार...

आळशीच्या बीयांच्या सेवनाचे फायदे (Benefits Of Flex Seeds)

आळशीच्या बीयांमधील फायबर्स पचनक्रिया सुधारण्यास गुणकारी ठरतात. मल त्याग करण्यास मदत होते. इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते.  संक्रमणाशी लढण्यास मदत होते. आळशीतील ओमेगा-३ फॅटी एसिड्स त्वचा आणि केसांना हायड्रेट ठेवतात. आळशीच्या बीयांची चटणी खाल्ल्याने  बॅड कोलस्टेरॉलचे प्रमाण कमी होते आणि शरीर निरोगी हेल्दी राहते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आळशीच्या बीयांचे सेवन करू शकता. 

आळशीची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Flex Seeds Chutney)

१) आळशीच्या बीया- १ कप

२) लसूण पाकळ्या-  १ कप

३)  हिरव्या मिरच्या - ३ ते ४

४) लिंबू - १

५) मीठ - चवीनुसार

आळशीची चटणी करण्याची कृती

१) पौष्टीकतेने परिपूर्ण आळशीची चटणी करणं खूपच सोपं आहे. ही चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी आळशीच्या बीया व्यवस्थित स्वच्छ करून घ्या त्यानंतर एका नॉनस्टिक पॅनला गरम करून त्यावर मध्यम आचेवर  चटणी ठेवा.

 

खाणं कमी तरी पोट सुटत चाललंय? रोज न चुकता किचनमधले ४ पदार्थ खा, भराभर घटेल वजन

२) मीडियम आचेवर पॅन गरम झाल्यानंतरर त्यात आळशीच्या बीया  घाला. १ ते २ मिनिटं कोरडं रोस्ट करून घ्या. भाजल्यानंतर आळशी चमच्याच्या मदतीने हलवत राहा. आळशी जळणार नाही याची पुरेपूर काळजी  घ्या. आळशी व्यवस्थित भाजली गेल्यानंतर गॅस बंद करू थंड होऊ द्या. 

चालणं होतं तरी पोट कमी होत नाही? फक्त १० मिनिटं ‘असा’ करा 'पॉवर वॉक'; कमी होईल पाेट

३) आळशीच्या बीया थंड झाल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यानंतर त्यात  चिरलेली मिरची, लसूण,  लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, २ ते ३ तीन टेबलस्पून पाणी घाला. नंतर जारचे झाकण व्यवस्थित लावून  चटणी वाटून घ्या. चटणी व्यवस्थित वाटून २ ते ३ वेळा ग्राईंड करून  घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला. पौष्टीकतेने परिपूर्ण आळशीच्या चटणीत तुम्ही पुदीन्याची पानं घालू शकता.  ज्यामुळे चटणीची चव अधिकच वाढेल.

Web Title: Flax Seeds Chutney Benefits : Eat One Spoon Of Flax Seeds Chutney in A Day For Improve Immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.