आपल्या रोजच्या डाएटसोबतच 'झोप'(Better Sleep) देखील तितकीच महत्वाची असते. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक असते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धि आणि इंद्रियांनाही ताजेतवाने करते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होते. आपली रात्रीची झोप ठीक झाली नाही तर पुढचा संपूर्ण दिवस आळस अंगात राहतो. जर आपल्या झोपेची पद्धत किंवा वेळ चुकीची असेल तर त्याचा हळुहळु आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो.
झोप नीट झाली नाही तर आपल्याला अपचन, गॅस, अॅसिडीटी अशा समस्या उद्भवू शकतात इतकेच नव्हे तर हार्मोनल इम्बॅलेन्सदेखील होऊ शकतो. सध्याच्या काळात झोप न येणं ही एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकजण झोप येण्यासाठी काही ना काही उपाय करण्याच्या प्रयत्नात असतोच. झोपताना आपले अंथरूण - पांघरूण, गादी कितीही चांगले असले तरीही झोप न येण्याच्या समस्येला अनेकजणांना सामोरे जावेच लागते. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडते आणि काहीवेळा त्यामुळे चिंता वाढते. कमी झोपेमुळे डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, तणाव, चिंता, एकाग्रतेचा अभाव ते रक्तदाबाच्या समस्यांपर्यंतच्या अनेक समस्या वाढतात. अशा परिस्थितीत झोपेची पद्धत सुधारणे देखील तितकेच आवश्यक आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञ, डॉ. निकिता कोहली यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओ मधून झोपेसंदर्भात (5 Golden Rules of Sleeping According to Ayurveda) काही आयुर्वेदिक नियम (5 sleep rules you must follow as per Ayurveda) शेअर केले आहेत ज्यांच्या मदतीने आपण आपली झोपेची पद्धत सुधारु शकता(Follow these 5 rules as per Ayurveda for better sleep).
आयुर्वेदानुसार काय आहेत झोपेचे ५ नियम...
१. उगवत्या व मावळत्या सूर्यानुसार झोपण्याच्या वेळा निश्चित करा :- आयुर्वेदानुसार जो माणूस लवकर निजे तो लवकर उठे असे वाक्य प्रचलित आहे. 'अर्ली टू बेड आणि अर्ली टू राईज' ही म्हण इथे लागू पडते. आयुर्वेदानुसार, जेव्हा आपण उगवत्या सूर्याबरोबर उठून आपली काम करण्यास सुरुवात करतो तेव्हा आपल्या शरीराची सर्कॅडियन लय योग्यरित्या कार्य करते. मात्र, सध्याची जीवनशैली पाहता हे रोजच शक्य होईल असे नाही. अशा परिस्थिती आपण आपल्या घराची अशी वेगळी सेटिंग करून घेऊ शकता. घरात लावलेल्या पांढऱ्या लाइट्समुळे पांढरा प्रकाश आपल्याला सूर्याची अनुभूती देऊ शकतो आणि जाड पडदे खिडक्यांना लावून आपण रात्र अनुभवू शकतात. अशा परिस्थितीत, आपल्या झोपेची पद्धत प्रकाशाशी जुळेल आणि हळूहळू आपल्या झोपेचे चक्र सुधारु लागेल.
सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...
२. झोपण्याच्या ३ तास आधी रात्रीचे जेवण करा :- जर आपण रात्री उशिरा जेवत असाल तर आपल्या झोपेची पद्धत बिघडू शकते. आयुर्वेदाच्या नियमानुसार, रात्री सात वाजल्यानंतर अन्न खाल्ल्याने अपचन, निद्रानाश यासारख्या समस्या वाढू शकतात. जर आपण झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी जेवण करुन घेतले असेल तर झोपायच्या आधी आपली पचनक्रिया सुरू होईल आणि अशा स्थितीत झोपेची वेळही हळूहळू योग्यरीत्या ठरवली जाईल. झोपण्यापूर्वीच आपली पचनक्रिया सुरू झाली तर पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात, असे आयुर्वेदात मानले जाते.
आपल्या वयानुसार किती झोप रोज आवश्यक असते ? कमी झोप झाली तर...
३. झोपण्यापूर्वी १ ते २ तास आधी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे बंद करा :- विशेषत: आपल्या झोपेचे चक्र बिघडवण्यासाठी गॅजेट्स जबाबदार असतात. यामुळे आपले नैसर्गिक झोपेचे चक्र नेहमीच विस्कळीत होते. डॉ. निकिता यांच्या म्हणण्यानुसार, रात्री ८:३० ते ९ या वेळेत आपण आपले फोन आणि गॅजेट्स बंद केले पाहिजेत. क्लीव्हलँडचे प्रसिद्ध स्लीप डिसऑर्डर तज्ज्ञ हरनीत वालिया (एमडी) यांनी याबाबत एक शोधनिबंध प्रकाशित केला. त्यांच्या मते, मोबाईल फोनमुळे आपले मन व्यस्त असते आणि त्यामुळे डोळ्यांचा रेटिना खराब होण्याची समस्या तर उद्भवतेच पण त्यामुळे हार्मोनल समस्याही उद्भवू शकतात. आपल्या झोपेचे चक्र बिघडू नये व चांगली झोप येण्यासाठी फोन बाजूला ठेवा आणि डोळ्यांना थोडा वेळ विश्रांती द्या.
४. नेहमी डाव्या कुशीवर झोपावे :- डॉ. निकिता यांच्या मते, जर आपण आपल्या डाव्या कुशीवर झोपलात तर आपल्याला चांगली झोप येते कारण यामुळे छातीत जळजळ आणि इतर पचन समस्या कमी होतात. या स्थितीमुळे घोरणे कमी होते आणि गाढ, शांत झोप लागते. त्यामुळे नेहमी झोपताना डाव्या कुशीवरच झोपावे जेणेकरुन व्यवस्थित झोप लागेल.
रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...
५. उन्हाळ्याशिवाय इतर कोणत्याही ऋतूंत दुपारी झोपू नका :- डॉ. निकिता यांच्या मते, उन्हाळ्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ऋतूंत दिवसा झोपल्याने कफ आणि पित्त दोष वाढतात. त्यामुळे शरीरात अधिक आळस भरतो आणि आपली दिवसभराची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. जर आपल्याला झोपेच्या गंभीर समस्या असतील तर, संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल. सोपेसंबंधित समस्यांवर वेळीच उपाय न केल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.