Join us   

गाेड फार आवडतं, नाहीच कमी खाता येत? ५ टिप्स, साखर विसराल आणि तरीही राहाल आनंदी फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2022 4:15 PM

Sweet Dish मेंदूला द्या असे प्रशिक्षण की गोड खायलाच विसराल, राहाल फिट ॲण्ड फाइन 

गोड पदार्थ कोणाला नाही आवडत? कोणाकोणाला गोडपदार्थ प्रचंड आवडते. तर, कोणीकोणी गोड पदार्थ एका मर्यादीपर्यंत खातात. मात्र अधिक गोड खाल्ल्याने अनेक आजार होत असतात. त्यातही साखर. त्यामुळे त्रास वाढतात. अधिक गोड आणि जंक फूड खाल्ले तर त्याचा त्रास होतोच. आपल्याला जर गोड पदार्थ खाणे कमी करायचे असेल तर काय करायचे? आपल्या मेंदूलाच गोड खावेसे वाटणार नाही किंवा कमी वाटेल असं ट्रेनिंग देता येईल का? त्यासाठीच या काही खास गोष्ट..

साखर धोकादायक 

अधिक साखरेचं सेवन केल्याने धोकादायक आजार उद्भवतात. काहीवेळेस आपण साखरेचं सेवन नकळतपणे करतो. जसे की, कोल्ड ड्रिंक्स, सोडा ड्रिंक्स किंवा पॉपकॉर्नमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, आणि अजाणतेपणे आपण साखरेचं सेवन करतो. या सर्व गोष्टींमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असते. जे रक्तातील साखर वाढण्याचे महत्त्वाचे कारण बनू शकतात. त्यामुळे लिमिटमध्ये साखरेचं सेवन करणे हे उत्तम ठरते. यासाठी मेंदूला कमी साखर खाण्याचे प्रशिक्षण द्या.

पोट भरते पण मन नाही 

गोडवा फक्त साखरेत नसून जेवणातील पदार्थांमध्ये देखील आढळून येते. तज्ज्ञांच्यामते, सामान्य आहार आणि सामान्य दिनचर्या पाळली तर रक्तातील साखर नियंत्रणात राहण्याची टक्केवारी अनेक पटींनी वाढते. इतकंच नाही तर प्री-डायबेटिक लोकांना मधुमेहापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, आहार घेतल्यानंतरदेखील आपण बहुतांशवेळा मेंदूचे ऐकतो. जेवण झाल्यानंतर देखील काही जण चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, स्वीट डिश पदार्थाचं सेवन करतो. आणि त्यामुळे अतिरिक्त साखर आपल्या अंगी जाते. आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे आहारानंतर इतर गोष्टी खाणे टाळावे.

मेंदूला ट्रेनिंग देणे गरजेचं 

सर्व काही गोष्टी आपल्या मेंदूमध्ये असते असे म्हटले जाते. आणि ते तंतोतंत खरं आहे. आपण आपल्या मेंदूमधून कोणती गोष्ट करायची आहे कोणती नाही याचे मार्गदर्शन घेत असतो. मुख्य म्हणजे व्यसने सोडण्यासाठी आपण ब्रेन ट्रेनिंग घेतो. खाण्याबाबतीतही आपण ब्रेन ट्रेनिंग घेऊ शकतो. बहुतांशवेळा खाण्यातील आवडती गोष्ट पाहिल्यास आपला खाण्यावरील नियंत्रण सुटते. आणि आपण ती गोष्ट खाण्यास सरसावतो. त्यामुळे मेंदूला  ट्रेनिंग देणे गरजेचं आहे. ब्रेन ट्रेनिंगमुळे आपले ईटिंग हॅबिट्स सुधारते आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे, काय आयोग्य हे निश्चित करून घेतले पाहिजे.

बेबी स्टेप्सने करा सुरुवात 

कधी कोणत्या गोष्टीत आपण जेव्हा बदल घडवून आणत असतो, तेव्हा आपण त्या गोष्टीच्या निगडीत छोट्या छोट्या गोष्टीत बदल आणतो. त्याचप्रमाणे साखर जर कमी करायची असेल तर, आपण आधी साखरयुक्त असणारे पदार्थ कमी प्रमाणात खाण्यास सुरु करू शकतो. एका झटक्यात कोणतीही गोष्ट बंद करणे चुकीचे असते. कारण, ती गोष्ट आपल्या शरीरासाठी एक सवय बनून जाते. त्यामुळे एकदम बंद करू नका थोडे थोडे करून खा आणि बंद करा. जर आपण चहामध्ये ३ चमचे साखर टाकून चहा पीत असाल तर, त्या ऐवजी १ किंवा २ चमचे टाका.

सामानातील यादीमधून काढा साखरयुक्त पदार्थ 

जेव्हा पण आपण सुपरमार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जातो, तेव्हा आपले लक्ष जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थावर पडते. त्या वस्तूंचे आकर्षक पॅकेजिंग ती वस्तू खरेदी करण्यास आपल्याला भाग पाडतात. त्यामुळे खरेदी करताना जंक फूड सेक्शनमध्ये जाणे टाळावे. ऑनलाईन सामान खरेदी करताना देखील हेल्थी फूडच्या कार्टमध्ये समावेश करावा. आणि इतर पदार्थ कार्टमधून बाहेर काढावे.

टॅग्स : हेल्थ टिप्सहृदयरोग