स्किन कॅन्सरनंतर ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) हा महिलांना होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरकडून आलेल्या आकडेवारीनुसार ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या रुग्णांना मागे सोडलं आहे. सर्वाधिक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर उद्भवत आहे. (Food and Cancer Risk)
ब्रेस्ट कॅन्सर इंडियाच्या रिपोर्टनुसार दर ४ मिनिटाला एका भारतीय महिलेमध्ये हा कॅन्सर डिटेक्ट होतो. तर दर ८ मिनिटाला स्तनांच्या कॅन्सरमुळे मृत्यू होतो. अनुवांशिकता, कौटुंबिक इतिहास याशिवाय ब्रेस्ट कॅन्सरची इतर अनेक कारणं आहेत. (Breast cancer in women) तुमची दिनचर्या ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्याचे काम करू शकते. अभ्यासानुसार काही पदार्थांचे सेवन केल्यानं ब्रेस्ट कॅन्सरचा धोका २० टक्क्यांनी वाढतो. ( Foods that can increase breast cancer risk by 20 percent study warns)
फ्रेंच मेडिकलच्या रिपोर्टनुसार ज्या महिला प्लांट बेस्ड अन्हेल्दी आहार घेतात त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. न्युट्रिशन २०२२ लाईव्ह ऑनलाईन अभ्यासात हेल्दी प्लांट बेस्ट खाद्य पदार्थ फळं, भाज्या, नट्स आणि शेंगांसारख्या पदार्थांचा समावेश करण्यात आला. तर अन्हेल्दी प्लांट बेस्ड खाद्य पदार्थांमध्ये रिफाईंड अन्न, व्हाईट राईस, ब्रेड आणि पीठाचा समावेश करण्यात आला.
हात पाय बारीक पण पोट खूप सुटलंय? गव्हाऐवजी खा ही खास मसाला चपाती
या अभ्यासातून काय सिद्ध झाले
या अभ्यासात ६४ हजार महिलांचा समावेश होता ज्यांच्या मेनोपॉज सुरू झाला होता. अभ्यासादरम्यान जवळपास २० वर्ष महिलांना ट्रॅक करण्यात आलं. डॉक्टरांना दिसून आलं की ज्या महिलांनी आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश केला होता त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका १४ टक्क्यांनी कमी झाला होता. ज्या महिलांनी अन्हेल्दी प्लांन्ट बेस्ट पदार्थांची निवड केली त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका २० टक्क्यांनी वाढला होता.
पेरिस साक्ले युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, 'या रिसर्चवरून दिसून येतं की अन्हेल्दी प्लांट बेस्ड आहार आणि मीट वगळून तुम्ही आहारात हेल्दी प्लांट बेस्ड पदार्थांचा समावेश करू शकता यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टळतो. काही कॉमन कार्बोहायड्रेट्स आहारातून टाळल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. त्यात बटाटा, शुगरयुक्त पदार्थ आणि फ्रुट ज्यूसचा समावेश आहे. '
घातक कॉलेस्ट्रॉल अन् वाढलेलं डायबिटीस घटवेल ही खास पालेभाजी; तब्येत राहील ठणठणीत, मेंटेन
अन्हेल्दी आणि हेल्दी कार्ब्स काय असतात?
कार्बोहायड्रेसचे तीन प्रकार असतात शुगर, स्टार्च आणि फायबर. साखरेला सामान्य कार्बोहायड्रेड्स म्हटलं जातं. अन्हेल्दी पदार्थांमध्ये हे सहज दिसून येतं मिठाई, कँन्डी, प्रोसेस्ड फूड आणि रेग्युलर सोडा. स्टार्चमध्येमधले कार्बोहायड्रेस् सामान्य साखरेपासून तयार होतात. उर्जा निर्मितीसाठी शरीराला स्टार्चची आवश्यकता असते.