Join us   

कंबर-पाठ खूप दुखते? रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधाचा खास फॉर्म्यूला; भरपूर कॅल्शियम मिळेल-ताकद येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 3:30 PM

Food For Strong Bones : कमी वयातच तुम्हाला कमकुवतपणा, थकवा जाणवत असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो

थोडं काम केलं की लगेच अशक्तपणा येतो, थकल्यासारखं वाटतं (Tiredness Solution) अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. शरीरात रक्ताची कमतरता, हाडांमध्ये वेदना होतात असे त्रास प्रत्येकालाच उद्भवतात. (Health Tips) जर तुम्हालाही फार चक्कर येत असतील आणि भूक लागत नसेल तर तुम्हाला कमकुवतपणाचा सामना करावा लागू शकतो. (How to boost Stamina) कमी वयातच तुम्हाला कमकुवतपणा, थकवा जाणवत असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Yog Guru Baba Ramdev Shared Banana And Dates Smoothie Recipe For Strong Bones) 

शरीर निरोगी राहण्यासाठी ताकद असणं फार महत्वाचे असते. ज्यामुळे तुमची इम्यूनिटी (Immunity) चांगली राहते आणि  आजारांशी लढण्याची क्षमता मिळते.  जर तुमचं वजन कमी जास्त होत असेल आणि अनेक प्रयत्नांनंतरही  वजन कमी  होत नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. योग गुरू बाबा रामदेव यांनी शरीराची ताकद वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे थकवा, कमकुवतपणा कमी होईल.  (Ram dev baba shares food for strong bones)

 

ताकद वाढवण्याचे ड्रिंक कसे तयार करायचे?  (How to Make Stamina Booster Drink)

दूध, केळी, खजूर, शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, पांढरी म्यूसली,  शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, सफेद मुसली, काळ्या कौच बिया हे साहित्य लागेल. सगळ्यात आधी एका  कपामध्ये दूध घ्या. थंड किंवा गरम कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता. दूधात केळी आणि खजूर घालून मिक्स करून  घ्या. त्यानंतर त्यात शतावरी, अश्वगंधा, पांढरी म्यूसली आणि कौंच बीयांची पावडर घालून एकत्र करा. नियमित हे दूध प्यायल्याने तब्येतीत सुधारणा दिसून येईल.

केळी आणि खजूर

बाबा रामदेव यांनी केळी आणि खजूर ताकद वाढवण्याचं एक उत्तम औषध असल्याचे सांगितले आहे. हे दोन्ही पदार्थ वजन वाढवण्यासाठी आणि रक्ताची कमतरता दूर करण्याासाठी ओळखले जातात. यात व्हिटामीन्स, आयर्न,  कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे पोषक तत्व असतात.

पोट सुटलंय, व्यायामासाठी वेळ नाही? रात्री १० नंतर गरम पाण्यात हा पदार्थ मिसळून प्या, झरझर घटेल वजन

खजूरात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि  आयर्न यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यांचे वजन कमी आहे त्यांच्यासाठी हा घरगुती उपाय परिणामकारक असल्याचे बाबा  रामदेव यांनी सांगितले आहे. रोज हे हेल्दी ड्रिंक प्यायल्यान वजन वाढते आणि पर्सनॅलिटीही चांगली राहते. 

रामदेव बाबांच्यामते हे ड्रिंक प्यायल्याने अशा लोकांना सगळ्यात जास्त फायदा होतो  ज्यांची इम्यूनिटी कमकुवत असते. जर तुम्हीही वारंवार आजारी पडत असाल तर हा उपाय करून पाहा. हे मिश्रण शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, सफेद मुसली यांसारक्या पदार्थांनी बनवले जाते.  रामदेव बाबांच्यामते हे मिश्रण प्यायल्याने शरीराची ताकद वाढते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सरामदेव बाबा