शरीरातलं युरीक ॲसिड वाढण खूप त्रासदायक ठरते. कारण अशा परिस्थितीत आरोग्याशी संबंधित सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते. खरं तर, जेव्हा आपली किडनी युरीक ॲसिड योग्यरित्या फिल्टर करू शकत नाही, तेव्हा हे हाडांच्या सांध्यावर क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. (How to Reduce Uric Acid) त्यामुळे पायाला सूज आणि सांधेदुखीचा त्रास जाणवतो. जेव्हा शरीरात प्युरीनचे पचन व्यवस्थित होत नाही, तेव्हा युरीक ॲसिडची पातळी वाढू लागते. (How to keep uric acid under control)
या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर रोजच्या आहारात बदल करायला हवा. GIMS हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथील प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांच्या मते, अक्रोडाचे नियमित सेवन केल्यास युरीक ॲसिडच्या समस्येवर मात करता येते. (Effective And Natural Ways To Reduce Uric Acid)
युरीक ॲसिड कमी करण्यात अक्रोड कसे फायदेशीर?
अक्रोड (Walnut) ओमेगा-३ चा समृद्ध स्रोत मानला जातो. त्यात तांबे, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. तसेच ते दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. (How to reduce uric acid level) या ड्रायफ्रूटमध्ये हेल्दी प्रोटीन्स आढळतात, ज्याचा उपयोग युरीक ॲसिडमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. जर हाडांच्या सांध्यावर युरीक ॲसिडचे स्फटिक स्थिरावले असतील तर अक्रोड खाल्ल्यानंतर ते हळूहळू कमी होऊ लागतात. (What is the best way to control uric acid)
रोज किती अक्रोड खायला हवेत?
जर तुम्ही दररोज 3-4 मध्यम आकाराचे अक्रोड खाल्ले तर युरीक ॲसिड कमी करणे सोपे होईल. हे ड्रायफ्रूट तुम्ही थेट खाऊ शकता किंवा स्मूदी, शेक किंवा सॅलड स्वरूपातही खाऊ शकता. काही लोकांना अक्रोड पाण्यात भिजवून खायला आवडते, ही पद्धत देखील खूप प्रभावी आहे.