Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Food for good sleep : रात्री चांगली झोपच येत नाही? बराचवेळ अंथरूणावर पडून विचार करता? चांगल्या झोपेसाठी 'हे' पदार्थ खा

Food for good sleep : रात्री चांगली झोपच येत नाही? बराचवेळ अंथरूणावर पडून विचार करता? चांगल्या झोपेसाठी 'हे' पदार्थ खा

Food for good sleep : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चांगली झोप येण्यासाठी तुम्ही तुमचा आहार निरोगी ठेवावा. आपण ज्या प्रकारे खातो त्याचा आपल्या एकूण शरीरावर परिणाम होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 01:00 PM2021-12-19T13:00:48+5:302021-12-19T13:35:40+5:30

Food for good sleep : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चांगली झोप येण्यासाठी तुम्ही तुमचा आहार निरोगी ठेवावा. आपण ज्या प्रकारे खातो त्याचा आपल्या एकूण शरीरावर परिणाम होतो.

Food for good sleep : Foods that helps you to sleep better and fight insomnia | Food for good sleep : रात्री चांगली झोपच येत नाही? बराचवेळ अंथरूणावर पडून विचार करता? चांगल्या झोपेसाठी 'हे' पदार्थ खा

Food for good sleep : रात्री चांगली झोपच येत नाही? बराचवेळ अंथरूणावर पडून विचार करता? चांगल्या झोपेसाठी 'हे' पदार्थ खा

दिवसभरातील दगदग, पैशांचं टेंशन यामुळे रात्री चांगली झोप लागणं कठीण झालंय. बराचवेळ अंथरूणावर पडल्यानंतर वेगवेगळे विचार येत असतात. सकाळी कामासाठी लवकर उठावं लागत असल्यानं अनेकांची झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही.  शरीर निरोगी ठेवण्यासाठी, सर्व लोकांनी दररोज रात्री 7-9 तासांची झोप पूर्ण केली पाहिजे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी झोप आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चांगली झोप येण्यासाठी तुम्ही तुमचा आहार निरोगी ठेवावा. आपण ज्या प्रकारे खातो त्याचा आपल्या एकूण शरीरावर परिणाम होतो. (Food for good sleep)

जीवनशैली आणि आहारातील गोंधळामुळे लोकांना झोपेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
झोपेच्या विकारांवर मात करण्यासाठी लोक अनेकदा औषधांकडे वळतात. आरोग्य तज्ञ म्हणतात की औषधांवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे आरोग्यास गंभीर हानी होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत, आपण त्या पदार्थांचे सेवन वाढवावे जे झोपेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. 

मधाचे सेवन

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर औषध म्हणून मधाचे अनेक वर्षांपासून सेवन केले जाते. काही लोक याचे साखरेचा पर्याय म्हणूनही सेवन करतात. अभ्यास दर्शवितो की मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, विरोधी दाहक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करणे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही एक ग्लास कोमट पाणी किंवा दूधात एक चमचा मध मिसळून पिऊ शकता.

रात्री दूध प्या

आपल्यापैकी बरेच जण रात्रीच्या वेळी दूध पितात. दुधात असलेले कॅल्शियम आणि इतर पोषक घटक हाडांसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे ओळखले जाते. रात्री दूध प्यायल्याने झोपेची गुणवत्ता देखील सुधारते.  झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रोज रात्री दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते, हे अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. झोपण्यापूर्वी कोमट दुधाचे सेवन केल्याने तणाव आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.

फॅटी फिश

आरोग्य तज्ज्ञ सांगतात, रात्रीच्या जेवणात सीफूड खाल्ल्याने तुमच्या झोपेचा फायदा होतो. सॅल्मन, मॅकेरल, अँकोव्हीज सारखे फॅटीफिश ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे समृद्ध स्त्रोत आहेत ज्यात झोपेसाठी कारणीभूत ठरणारे हॉर्मोन वाढवणारे गुणधर्म आहेत. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकते. रात्रीच्या जेवणात फॅटी माशांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Food for good sleep : Foods that helps you to sleep better and fight insomnia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.