Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यात पोटाची इन्फेक्शन होतात, हमखास पोट बिघडते त्याची कारणे, तज्ज्ञ सांगतात...

पावसाळ्यात पोटाची इन्फेक्शन होतात, हमखास पोट बिघडते त्याची कारणे, तज्ज्ञ सांगतात...

Food poisoning in the monsoon: The causes and symptoms पावसाळ्यात उलट - सुलट खाणे टाळा, आरोग्याची काळजी घ्या, नाहीतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 04:30 PM2023-07-12T16:30:53+5:302023-07-12T16:31:46+5:30

Food poisoning in the monsoon: The causes and symptoms पावसाळ्यात उलट - सुलट खाणे टाळा, आरोग्याची काळजी घ्या, नाहीतर..

Food poisoning in the monsoon: The causes and symptoms | पावसाळ्यात पोटाची इन्फेक्शन होतात, हमखास पोट बिघडते त्याची कारणे, तज्ज्ञ सांगतात...

पावसाळ्यात पोटाची इन्फेक्शन होतात, हमखास पोट बिघडते त्याची कारणे, तज्ज्ञ सांगतात...

पावसाळा सुरु झाला की अनेकांना विषबाधा होण्याची समस्या भेडसावते. अशा स्थितीत खाण्या - पिण्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात वातावरण दमट होते. ज्यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचत नाही, किंवा पचायला वेळ लागतो. इतर ऋतूच्या तुलनेत खवय्येवर्ग पावसाळ्यात अधिक प्रमाणात बाहेरचे पदार्थ खातात.

दिवसभरात आपण जे काही खातो, त्यातील काही पदार्थ पौष्टीक तर काही तब्यतीसाठी अपायकारक ठरू शकतात . ज्यामुळे उलटी, जुलाब, पोटदुखी या समस्या निर्माण होतात. अनेकदा अन्नातून विषबाधा देखील होते. अशा स्थितीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी? अन्नातून विषबाधा झाल्यास काय करावे? असे प्रश्न निर्माण होतात(Food poisoning in the monsoon: The causes and symptoms).

फूड पॉईजनिंग म्हणजे काय?

यासंदर्भात, सर गंगाराम हॉस्पिटलचे इन्स्टिटय़ूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड पॅनक्रियाटिक बिलीरी सायन्सचे सल्लागार डॉ. श्रीहरी अनिखिंडी सांगतात, ''बॅक्टेरिया, बुरशी किंवा इतर विषाणू अन्नात मिसळल्यानंतर विषबाधा निर्माण होते. हे अन्न आणि पेय आपल्या पोटात जातात, जे थेट आपल्या आतड्यांना नुकसान पोहचवते. यामुळे होणाऱ्या आजाराला फूड पॉईजनिंग असे म्हणतात.''

१ चमचा मध खाण्याचे ५ फायदे, वजन कमी होण्यापासून मेंदू तेज होण्यापर्यंत गुणकारी मध

अन्नामध्ये संसर्ग का होतो?

पावसाळ्यात कच्च्या भाज्या किंवा इतर पदार्थांमध्ये जीवाणू वाढू लागतात. जर हे अन्न नीट शिजले नाही तर, त्यात विषाणू तसेच जिवंत राहतात. ज्यामुळे फूड पॉईजनिंगसारखी समस्या वाढते. साधारणपणे भाजी किंवा कोणतीही गोष्ट नीट शिजली तर बॅक्टेरिया मरतात. यामुळे अन्नातून विषबाधा होत नाही.

हे जीवाणू पोटात काय करतात?

डॉ.श्रीहरी अनिखिंडी यांच्या म्हणण्यानुसार, ''दूषित अन्न किंवा पाणी आपल्या पोटात गेल्यानंतर, अन्नातून बाहेर पडणारे जिवाणू झपाट्याने वाढू लागतात. हे बॅक्टेरिया आपल्या आतड्यात आधीपासूनच असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांना मारायला लागतात. ज्यामुळे अन्न पचत नाही. आतड्यांमध्ये सूज निर्माण होते. ज्यामुळे अनेक आजार निर्माण होऊ शकतात.''

स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा

फूड पॉईजनिंगचे लक्षणं काय?

लूज मोशन, पोटदुखी आणि उलट्या ही अन्नातून होणाऱ्या विषबाधाची मुख्य लक्षणे आहेत. यासोबतच पोटदुखी, भूक न लागणे, मळमळ होणे आदी तक्रारीही दिसून येतात. परंतु, या लक्षणांसह लघवी कमी येणे, हात-पाय थंड होणे, अशक्तपणा येणे, अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

Web Title: Food poisoning in the monsoon: The causes and symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.