Join us   

तुम्ही जे 'सुपरफूड' म्हणून खाता तेच आरोग्यासाठी धोकादायक! वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2024 2:23 PM

Health Tips Regarding Super Foods: सुपरफूड म्हणून तुम्ही जे पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाता, तेच तुमच्या आरोग्यासाठी कसे धोकादायक ठरू शकतात, ते पाहा...(expert suggests 3 superfoods that are secretly bad for health)

ठळक मुद्दे ते पदार्थ खाल्ल्यानंतर तात्पुरतं बरं वाटत असलं तरी त्यांचा अतिरेक तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो..

हल्ली बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की आहारातून पुरेशी खनिजे, जीवनसत्त्वे न मिळाल्याने त्यांच्या शरीरामध्ये कोणत्या ना काेणत्या घटकांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे मग ते त्यांच्या आहारात इतर अनेक पदार्थही घेतात जे त्यांना इंस्टंट एनर्जी देतील. बऱ्याचदा त्या पदार्थांना आपण सुपरफूड किंवा हेल्थ ड्रिंक, हेल्दी फूड असं म्हणतो. ते पदार्थ खाल्ल्यानंतर तात्पुरतं बरं वाटत असलं तरी त्यांचा अतिरेक तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो (food that you consume as a superfood may be harmful for your health). त्यामुळे असे पदार्थ आहारात घेणं पुर्णपणे टाळा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत. ते पदार्थ नेमके कोणते आणि तुम्हीही ते खाता का हे एकदा तपासून पाहा...(expert suggests 3 superfoods that are secretly bad for health)

 

तुम्हीही सुपरफूड म्हणून हे पदार्थ खाता का?

सुपरफूड म्हणून आपण जे पदार्थ खातो, ते आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात, याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी consciouslivingwithshali या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. बघा त्यांनी सांगितलेले पदार्थ कोणते...

तुळस डेरेदार होतच नाही, पानंही हिरवीगार नसतात? किचनमधले २ पदार्थ वापरा- लगेच बहरून जाईल

१. ग्रीन टी

आहारतज्ज्ञ सांगतात की ग्रीन टी आराेग्यासाठी अतिशय गुणकारी आहे, असं तुम्ही ऐकत आला आहात. पण तसं मुळीच नाही. त्यात खूपच थोड्या प्रमाणात गुणकारी घटक असतात. त्यामुळे वेटलॉससाठी किंवा बेली फॅट कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरतो असं मुळीच नाही. तो तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल तर ते आरोग्यासाठी मुळीच चांगलं नाही.

 

२. फ्रुट ज्यूस

बाजारात खूप वेगवेगळ्या फळांचे पॅक केलेले रस मिळतात. ते रस नैसर्गिक आहेत, असं सांगितलं जातं.

पावसाळ्यात घरभर चिलटं, माश्या झाल्याने वैताग आला? १ सोपा उपाय करा, चिलटे- माश्या गायब....

पण वास्तविक पाहता त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर आणि प्रिझर्व्हेटीव्ह असतात जे आरोग्यासाठी मुळीच चांगले नाहीत. 

 

३. हेल्थ ड्रिंक

दुधात टाकून पिण्यासाठी बाजारात खूप वेगवेगळ्या पावडर मिळतात. या पावडर मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनाही अगदी सर्रास दिल्या जातात. त्या पावडरमधून जीवनसत्त्वे, पोषक घटक मिळतात, असा दावा केला जातो.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

पण वास्तविक पाहता ते तुमच्या किंवा मुलांच्या आरोग्यासाठी अजिबातच चांगले नसते. त्यामुळे तुमच्या तब्येतीला कोणताही फायदा होत नाही. फक्त दुधाला वेगळी चव येण्यासाठीच ते उपयुक्त ठरतात, असं आहारतज्ज्ञ सांगतात. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नफळे