Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अंगदुखी-अशक्तपणा-कॅल्शियम कमी झालं? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय, हाडं होतील बळकट

अंगदुखी-अशक्तपणा-कॅल्शियम कमी झालं? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय, हाडं होतील बळकट

Foods For Calcium (Calcium Vadhvnyasathi Kay khave) : योगगुरू बाबा रामदेव यांनी कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 03:58 PM2024-01-10T15:58:06+5:302024-01-10T17:37:17+5:30

Foods For Calcium (Calcium Vadhvnyasathi Kay khave) : योगगुरू बाबा रामदेव यांनी कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहेत.  

Foods For Calcium : Best Foods for Calcium Suggested by Baba Ramdev | अंगदुखी-अशक्तपणा-कॅल्शियम कमी झालं? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय, हाडं होतील बळकट

अंगदुखी-अशक्तपणा-कॅल्शियम कमी झालं? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय, हाडं होतील बळकट

शरीराच्या चांगल्या कार्यासाठी प्रोटीन्स आणि व्हिटामीन्सची आवश्यकता असते. (Healthy Foods High in Calcium)  कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आणि हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. (Health Tips)

याशिवाय शरीराची कार्यपद्धतीही सुरळीत राहते. (Calcium Rich Foods) कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी कॅल्शियम रिच फूड्स, दूध, पनीर, केल, भेंडीची भाजी, सोया यांसारख्या पदार्थांचे सेवन करायला हवे.  योगगुरू बाबा रामदेव यांनी कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहेत. (Top 3 Calcium Rich Food) 

वेबएमडीच्या रिपोर्टनुसार अंजिर, हिरव्या भाज्या, सोयाबीन, ब्रोकोली, नट्स हे कॅल्शियमचे वेगन स्त्रोत आहेत.  कॅल्शियमचे योग्य प्रमाण असल्यास ब्लड वेसल्स कॉन्ट्रक्ट आणि रिलॅक्स होतात. ज्यामुळे हेल्दी ब्लड प्रेशर मेंटेन राहते.  अलिकडेच समोर आलेल्या अभ्यासानुसार कॅल्शियम देणारे नैसर्गिक पदार्थ खाल्ल्याने  जास्त  प्रोटीन्स मिळतात.

शरीरात कॅल्शियम नसेल तर कोणती लक्षणं दिसून येतात? (Top 3 Calcium Rich Food)

स्मृती कमी होणं, मांसपेशींमध्ये वेदना, हात-पाय आणि चेहरा सुन्न होणं आणि हाता-पायांमध्ये झिणझिण्या येणे,  विचार करण्याची क्षमता कमी होणं, मांसपेशीत वेदना, कमकुवतपणा हाडं कमकुवत होणं अशी लक्षणं जाणवतात.

मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

दूधात हळद घालून प्या

योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले की दूध कॅल्शियमचा सगळ्यात उत्तम स्त्रोत आहे. दूधात हळद मिसळून प्यायल्याने हाडं चांगली राहतात आणि पोषणही मिळते. हळदीच्या दुधात अनेक एंटी ऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्व असतात ज्यामुळे संपूर्ण शरीराला पोषण मिळते. 

मधाबरोबर घ्या मोती पिष्टी

मोती पिष्टी एक आयुर्वेदीक औषध आहे जे तुम्हाला सहज कुठेही मिळेल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हा उपाय करू शकता. रामदेव बाबा सांगतात की मोती पिष्टी मधाबरोबर घेतल्याने तुम्हाला योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळेल आणि हाडं मजबूत राहण्यास मदत  होईल. 

पोट सुटलं-मांड्या जाडजूड दिसतात? थंडीत पपईच्या २-३ फोडी खा, सुटलेलं पोट होईल कमी

दूधाबरोबर घ्या गुग्गुळ

गुग्गुळ कॅल्शियमयुक्त एक हर्बल औषधी आहे. यामुळे हांडाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. बाबा रामदेव यांच्यामते या औषधासह दूधाचे सेवन केल्याने कमकुवत हाडांना कॅल्शियम मिळते आणि भरपूर ताकद मिळते.  वजन कमी करण्याच्या अनेक उत्पादनांमध्ये गुग्गुळाचा वापर केला जातो. 

फोर्टिफाईड फूड

  डाळी, कडधान्य कॅल्शियमचे परिपूर्ण असतात. यातून तुम्हाला जास्तीत जास्त कॅल्शियम मिळते तर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर अशा पदार्थांचे सेवन करू शकता. जेणेकरून जास्तीत जास्त पोषण मिळेल.

डेअरी उत्पादनं

दूध, दही, चिझ यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. यामुळे कॅल्शियम शोषले जाण्यास मदत होते. याऊलट प्लांट बेस्ड पदार्थांतून कमी प्रमाणात कॅल्शियम मिळते.

Web Title: Foods For Calcium : Best Foods for Calcium Suggested by Baba Ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.