Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडीत कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढलाय? ५ पदार्थ खा, पोट राहील साफ, गॅसेसचा त्रासही होईल कमी

थंडीत कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढलाय? ५ पदार्थ खा, पोट राहील साफ, गॅसेसचा त्रासही होईल कमी

Foods for Constipation : ही समस्या उद्भवल्यास पोट व्यवस्थित साफ होत नाही,  गॅसेसचा त्रास होतो. मल विसर्जन करताना वेदना, रक्त बाहेर येणं अशा त्रासदायक समस्या वाढतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 03:49 PM2022-11-23T15:49:09+5:302022-11-23T16:23:19+5:30

Foods for Constipation : ही समस्या उद्भवल्यास पोट व्यवस्थित साफ होत नाही,  गॅसेसचा त्रास होतो. मल विसर्जन करताना वेदना, रक्त बाहेर येणं अशा त्रासदायक समस्या वाढतात.

Foods for Constipation : Add these 5 foods in your daily diet to beat constipation naturally | थंडीत कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढलाय? ५ पदार्थ खा, पोट राहील साफ, गॅसेसचा त्रासही होईल कमी

थंडीत कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढलाय? ५ पदार्थ खा, पोट राहील साफ, गॅसेसचा त्रासही होईल कमी

चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल लोकांना कॉन्स्टिपेशन, गॅसचा त्रास उद्भवत आहे.  जास्तवेळ बसून काम केल्यानं, बाहेरचं खाल्ल्यानं ही समस्या वाढते. वारंवार होणाऱ्या गॅसच्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास  कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. ही समस्या उद्भवल्यास पोट व्यवस्थित साफ होत नाही,  सतत गॅस, अनेकदा मल विसर्जन करताना वेदना, रक्त बाहेर येणं अशा त्रासदायक समस्या वाढतात. ( Add these 5 foods in your daily diet to beat constipation naturally)

आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार यांच्या मते, बद्धकोष्ठता प्रामुख्याने वात दोषाच्या असंतुलनामुळे होते. याची अनेक कारणे असू शकतात. जास्त कोरडे, थंड, मसालेदार, तळलेले आणि फास्ट फूडचे अतिसेवन, पुरेसे पाणी न पिणे, अन्नात फायबर कमी असणे, चयापचय कमी होणे, रात्री नीट झोप न लागणे, उशिरा जेवणे इतर कारणं असू शकतात. डॉक्टरांच्या मते, बद्धकोष्ठतेवर अनेक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत, परंतु कॉन्स्टिपेशनचा त्रास मुळापासून दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

मनुके

मनुक्यांमध्ये फायबरर्स असतात, जे आतड्यांना सुरळीत हालचाल करण्यास मदत करतात. मनुके भिजवून खाणं आवश्यक आहे कारण कोरडे पदार्थ तुमचा वात दोष वाढवतात आणि त्यामुळे जठराची समस्या निर्माण होऊ शकते. भिजवल्याने ते पचायला सोपे जाते.

खजूर

बद्धकोष्ठता, अतिअ‍ॅसिडिटी, सांधेदुखी, चिंता, केस गळणे आणि कमी उर्जेने त्रस्त असलेल्यांना वात आणि पित्त संतुलित करण्यास खजूर मदत करते. चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी २-३ खजूर कोमट पाण्यात भिजवून खाव्यात.

मेथीचं पाणी

एक चमचा मेथी रात्रभर भिजवून सकाळी प्रथम खाऊ शकता. तुम्ही बियांची पावडरही बनवू शकता आणि झोपताना १ चमचा मेथी पावडर कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. जास्त वात आणि कफ असलेल्या लोकांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. जास्त पित्त (उष्णतेची समस्या) असलेल्यांनी ते टाळावे.

गाईचं तूप

गाईचे तूप तुमचे चयापचय सुधारते. हे तुम्हाला शरीरात निरोगी चरबी राखण्यास मदत करते जे जीवनसत्त्वे A, D, E आणि K सारख्या चरबी विरघळणारे जीवनसत्त्वे शोषून घेण्यासाठी आवश्यक आहे. 1 चमचे गाईचे तूप एक ग्लास कोमट गाईच्या दुधासह दीर्घकालीन बद्धकोष्ठता असलेल्या लोकांसाठी चांगले काम करते. हा उपाय सर्वांसाठी उत्तम आहे.

आवळा

आवळा एक अद्भुत रेचक आहे आणि सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे घेतल्यास केस गळणे, पांढरे केस, वजन कमी होणे आणि इतर आरोग्य समस्यादेखील दूर होण्यास होते. तुम्ही 1 चमचे आवळा पावडर किंवा 3 ताजे आवळे खाऊ शकता. 

Web Title: Foods for Constipation : Add these 5 foods in your daily diet to beat constipation naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.