पोटासंबंधित समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. कारण हळूहळून हे आजार वाढून मोठ्या रोगाचं कारण ठरतात. खाण्यापिण्यातील अनियमितता, पोटदुखी तर कधी ब्लोटींगचं कारण ठरते. (Foods to Help You Poop When You're Constipated) पोट साफ होण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश केला तर आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. (Foods for Constipation)
पोट व्यवस्थित साफ का होत नाही?
आहारात फायबर्सची कमतरता, मैदायुक्त पदार्थांचे सेवन, तळलेले-मसालेदार पदार्थ खाणं, कमी पाणी पिणं, वेळेवर न जेवणं, रात्री उशीरा जेवणं, अधिक प्रमाणात कॉफी, तंबाखूचे सेवन, अन्न पचलेलं नसताना पुन्हा खाणं, हॉर्मोन्सचं असंतुलन, सतत पेनकिलर घेणं. या गोष्टींमुळे कॉन्स्टीपेशनची समस्या वाढते.
लक्षणं
मलत्याग करताना जास्त दबाव येणं, पोटात वेदना, गॅस तयार होणं, मल सुकणं, डोकेदुखी, आळस येणं, तोंडातून दुर्गंध येणं, त्वचेवर पुळ्या येणं.
पोट साफ होण्यासाठी काय खायचं?
१) पपई
पपई तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. पपईतील फायबर्स पोटाच्या मेटाबॉलिक क्रियांचा वेग वाढवते आणि लॅटक्सटेसिव्हप्रमाणे काम करते. यामुळे पचनक्रिया वेदना होते आणि मल त्याग करणं सोपं होतं पोट साफ होण्यास मदत होते.
२) किव्ही
किव्हीमध्ये फायबर्स आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय यात एक्टिनिडाइन(actinidain) एंजाईम्स असतात. ज्यामुळे डायजेस्टीव्ह एंजाम्स वाढतात. हे पचनतंत्र वेगानं काम करते आणि आतड्यांची हालचाल व्यवस्थित होते. याव्यतिरिक्त व्हिटामीन्सनं परीपूर्ण पदार्थ गॅसची समस्या दूर करण्यास मदत करतात. जर तुमचं पोट साफ होत नसेल तर नाश्त्याला किव्ही आवर्जून खा.
३) पिअर
पिअरचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते. हे एक लॅटक्सटेसिव्ह (रेचक) म्हणून काम करते कारण त्यात फायबर असते आणि पचन गती वाढते. हे शरीरातील पाणी शोषून घेते आणि आतड्याची हालचाल गतिमान करते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.