Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीर कमजोर झालंय-थकवा येतो? B-12 कमतरता भरून काढतील ५ पदार्थ, रोज खा-फिट राहाल

शरीर कमजोर झालंय-थकवा येतो? B-12 कमतरता भरून काढतील ५ पदार्थ, रोज खा-फिट राहाल

Foods For Vitamin B-12 Deficiency : शरीरातील कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:32 AM2024-07-28T11:32:29+5:302024-07-28T11:35:08+5:30

Foods For Vitamin B-12 Deficiency : शरीरातील कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा.

Foods For Vitamin B-12 Deficiency : How To Get Vitamin B-12 From Veg Food Best Foods For Vitamin B-12 | शरीर कमजोर झालंय-थकवा येतो? B-12 कमतरता भरून काढतील ५ पदार्थ, रोज खा-फिट राहाल

शरीर कमजोर झालंय-थकवा येतो? B-12 कमतरता भरून काढतील ५ पदार्थ, रोज खा-फिट राहाल

व्हिटामीन बी-१२ ला (Vitamin B-12) कोबालामिन असेही म्हमतात. रक्ताच्या पेशांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते. रक्ताच्यापेशींना  निरोगी ठेवण्यासाठीही मदत होते. इतर व्हिटामीन्सप्रमाणे व्हिटामीन-१२ शरीराला उर्जा  देण्याचे काम  करते. व्हिटामीन पशूखाद्यपदार्थामध्ये आढळते. (Food For Vitamin B-12) शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असते असा समज असतो पण या व्हिटामीन्सची शरीरातील कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. (How To Get Vitamin B-12 From Veg Food)

शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास एनिमिया, मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणं अशा समस्या उद्भवू शकतात. रोजच्या आहारात काही व्हेज पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन बी-१२ कमतरता भरून काढू शकता. (Best Foods For Vitamin B-12)

एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी दूध हे सगळ्यात  उत्तम ड्रिंक आहे. यामुळे नसा, हाडं आणि मेंदू चांगला राहतो.  सोयाबीनमध्ये व्हिटामीन बी-१२ असते. आंबवलेले सोयाबीन ज्याला टम्पेह असेही म्हणतत यात व्हिटामीन -१२ चे प्रमाण जास्त असते.

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

आंबवण्याच्या प्रक्रियेदरम्यान यात तयार होणारे गुड बॅक्टेरियाज व्हिटामीन बी-१२ चे प्रमाण वाढवतात. याशिवाय ब्रोकोली, शतावरी, मोड आलेले मूग, कोरियन व्हेजिटेबल किमची यात  व्हिटामीन बी-१२ चे प्रमाण  जास्त असते.

संत्र्याच्या रसाचेही तुम्ही सेवन करू शकता. यामुळे डिडायड्रेशनच्या समस्येपासून बचाव होतो आणि शरीरातील व्हिटामीन बी-१२ कमतरता भरून निघते. यात एंटीऑक्सिडेंट्स, व्हिटामीन सी आणि फायबर्स असतात. सोया मिल्कसुद्धा ही कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरते.

पोटावर टायर-कंबर जाड, फिगर बिघडली? किचनमधला 'हा' पदार्थ रोज खा, घटेल चरबी

सोयामिल्क तुम्ही साध्या दुधाऐवजी पिऊ शकता. बदाम मिल्कचेही सेवन करू शकता. ज्यांना लॅक्टोज इन्टॉलरेजंची समस्या असेल तर हा उत्तम पर्याय आहे. कारण हे प्यायल्याने लॅक्टोज असंवेदनशीलतेमुळे होणारे ब्लोटींग, खाज, उलट्या यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

व्हिटमीन बी-१२ ची कमतरता कोणामध्ये उद्भवते

साधारणपणे वयस्कर लोक, गॅस्ट्रोइंटेस्टायन विकार असलेले लोक किंवा क्रोहन आजार, सिलिएक आजार. ज्यांनी गॅस्ट्रोइंटेस्टायल सर्जरी केली आहे  जसं की बॅरिएट्रिक सर्जरी किंवा आतड्यांची रिसेक्शन सर्जरी, फक्त शाकाहारी आहारावर राहणारे लोक,  जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेटाफॉर्मिन घेतात. या स्थितीत शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता उद्भवू शकते.

Web Title: Foods For Vitamin B-12 Deficiency : How To Get Vitamin B-12 From Veg Food Best Foods For Vitamin B-12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.