Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन-D ची कमतरता; 5 पदार्थ खा, उन्हात न जाताच व्हिटामीन मिळेल

शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन-D ची कमतरता; 5 पदार्थ खा, उन्हात न जाताच व्हिटामीन मिळेल

Foods For Vitamin D : आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:21 PM2024-01-16T12:21:24+5:302024-01-16T12:39:13+5:30

Foods For Vitamin D : आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढू शकता

Foods For Vitamin D : Best foods That Are High in Vitamin D By Health Experts | शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन-D ची कमतरता; 5 पदार्थ खा, उन्हात न जाताच व्हिटामीन मिळेल

शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन-D ची कमतरता; 5 पदार्थ खा, उन्हात न जाताच व्हिटामीन मिळेल

(Image Credit-Veganfitlyfe)

सतत टेंशन येणं, डिप्रेशनमध्ये असणं, कंबरदुखी-पाठदुखी उद्भवत असेल किवा सतत मसल्स क्रॅम्प्स येत असतील. तुमच्या शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता (Vitamin D Deficiency) असू शकते. व्हिटामीन डी मिळावे यासाठी कोवळं ऊन अंगावर (Sunlight) घेण्याचा सल्ला दिला जातो. पण व्हिटामीन  डी ची कमतरता भासल्यास अनेक लक्षणं दिसून येतात. (Best Source Of Vitamin D)

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोटोजीच्या रिपोर्टनुसार व्हिटामीन डी ची कमतरता भासल्यास मानसिक स्थितीवर परिणाम होतो. (Fantastic Food To Boost Your Vitamin D)  यामुळे डिप्रेशनही येऊ शकते अनेक रिसर्चमधून समोर आले आहे की आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढू शकता. (Foods Which Is High in Vitamin D)

व्हिटामीन डी ची कमतरता टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. बालरोगतज्ज्ञ  डॉक्टर दीपिका राणा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. व्हिटामीन डी ची कमतरता भासल्यास चाचणी करायला हवी आणि व्हिटामीन डी युक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा. व्हिटामीन डी ची सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता.

मशरूम

मशरूम सुर्यप्रकाशात वाढते यात व्हिटामीन डी बरोबरच अनेक मिनरल्सही असतात. मशरूमची भाजी किंवा सॅण्डविचमध्ये तुम्ही  खाऊ शकता. ज्यातून ुतुम्हाला भरपूर व्हिटामीन्स मिळतील.

फोर्टिफाईड फूड

पोषणासंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी काही खाद्य पदार्थ व्हिटामीन  डी ने फोर्टिफाईड केले जाते.  या खाद्य पदार्थात दूध, संत्र्याचा रस, सेरेल्स, प्लांट बेस्ड पदार्ख, बदाम, सोया मिल्क यांचा समावेश आहे.

केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

कॉड लिव्हर ऑईल

कॉड लिव्हल ऑईल व्हिटामीन डी चा एक चांगला पर्याय आहे.  व्हिटामीन ए आणि ओमेगा-३ फॅटी एसिड प्रदान करते. सप्लिमेंट्सच्या स्वरूपात व्हिटामीन डी चे सेवन वाढवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

पनीर 

पनीरमधून  प्रोटीन, कॅल्शियमप्रमाणेच व्हिटामीन डी सुद्धा मिळते.  पनीपे सेवन करण्याव्यतिरिक्त तुम्ही योगर्ट, दलिया आणि ओट मिल्कचा आहात समावेश करू शकता.

ओटीपोट फार सुटलंय? चपाती किंवा भाताबरोबर 'या' ४ भाज्या खा, पटकन वजन कमी होईल

दूध आणि तूप

दूध आणि गाईचे तूप शरीरातील  व्हिटामीन्सची कमतरता दूर करते. याव्यतिरिक्त दही आणि तूपसुद्धा व्हिटीमीन डी चा चांगला स्त्रोत आहे.  लहान मुलांची बोन डेंसिटी वाढवण्यासाठी तुम्ही आहारात बटर, दही, पनीर या पदार्थांचा समावेश करू शकता.

Web Title: Foods For Vitamin D : Best foods That Are High in Vitamin D By Health Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.