निरोगी शरीरासाठी दात निरोगी असणंसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. दातांकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यावर पिवळा थर जमा होतो. यामुळे दुर्गंधी येते. परिणामी श्वासांचे त्रास, हिरड्यांमधून रक्त बाहेर येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. (Oral Care Tips) रोजच्या चुकीच्या सवयी, चहा कॉफीचे सेवन, स्मोकींग करणं, कोल्ड ड्रिंक्स आणि गोड पदार्थांचे अतिसेवन दात पिवळे होण्यास कारणीभूत ठरतं. दातांची अस्वच्छता दूर करण्यासाठी काही सोप्या सवयी फायदेशीर ठरू शकतात. (How to whiten teeth) असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यानं दातांचे आरोग्य चांगले राहते ते पाहूया. (What foods help keep teeth white)
गाजर
सफरचंदाप्रमाणे गाजरातही फायबर भरलेले असते आणि ते खाल्ल्याने दातांवर जमा झालेला प्लेक निघून जातो, ज्यामुळे चमक येते. गाजराच्या सेवनाने लाळेचे उत्पादनही वाढते. जे नैसर्गिकरित्या दात स्वच्छ करतात. दात स्वच्छ करण्याव्यतिरिक्त, गाजरमध्ये अनेक बी जीवनसत्त्वे असतात, जे हिरड्यांना आलेल्या सुजेशी लढतात.
स्ट्रोबेरी
NIH च्या अभ्यासात असे आढळून आले की स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते, जे बहुतेक वेळा काही प्रकारच्या टूथपेस्टमध्ये आढळते. मॅलिक अॅसिडचे म्हणून काम करते आणि दातांच्या मुळांपासून प्लेक काढून टाकते. सायट्रिक ऍसिड स्ट्रॉबेरीमध्ये देखील आढळते.
कलिंगड
स्ट्रॉबेरीच्या तुलनेत टरबूजमध्ये जास्त प्रमाणात मॅलिक अॅसिड असते. मॅलिक अॅसिड तुमचे दात पांढरे करण्यासाठी आणि लाळ उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहेत. कलिंगडाचा तंतुमय पोत दाक स्वच्छ करतो. ज्यामुळे डाग दूर होण्यास मदत होते.
कांदा
कांद्यात गुणकारी एंटी बॅक्टेरिअल आणि एंटीमायक्रोबिअस गुणधर्म असतात. यामुळे बॅक्टेरियांचा नाश होऊन दातांमध्ये किड लागत नाही. याशिवाय कांदा सॅलेड्सच्या स्वरूपात खायला हवा.