Join us

चहासोबत कधीही खाऊ नका ५ गोष्टी; अपचन वाढेल कारण तब्येतीसाठी ‘हा’ पदार्थ अतिशयक घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2024 17:03 IST

Foods to completely avoid pairing with tea : चहासोबत बिस्किटे आणि भजी खाणाऱ्यांनो एकदा ही बातमी वाचाच..

वेळेला चहा सर्वांनाच लागतो. चहाशिवाय काहींची सकाळ होत नाही (Tea Time Snacks). काही जण २ वेळेस तर काही जण १ वेळेस चहा पितात. पण चहासोबत काहींना बिस्कीट किंवा इतर नमकीन पदार्थ लागतात (Health Care). बिस्किटे, भजी, समोसे लोक चहासोबत खातात (Fried Snacks). पण चहासोबत तळलेले आणि गोड पदार्थ टाळावेत. चहासोबत कोणत्या गोष्टी खाव्या, कोणत्या टाळाव्या? या गोष्टी माहित असणं गरजेचं.

टाईम्सप ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'लोकांनी चहासोबत बिस्किटे, केक आणि चॉकलेटसारखे गोड पदार्थ खाणं टाळावे. गोड चहासोबत गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते. ज्यामुळे शरीरात उर्जेची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे चहा पिण्याची इच्छा झाली तर, काळा चहा प्या, त्यात दूध न घालता प्या(Foods to completely avoid pairing with tea).

मान्सूनचं आगमन होताच मुलं आजारी पडतात? ४ हेल्दी पदार्थ; इम्युनिटी होईल बुस्ट - ताकद वाढेल..

चहासोबत कोणते पदार्थ खाऊ नये

- तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने इन्शुलिन रेझिस्टन्स, बीपी, पोटाची चरबी, ॲसिडिटी आणि पचनाच्या इतर समस्याही होऊ शकतात. शिवाय तळलेले पदार्थ खाल्ल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.

अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे; पण गरोदरपणात बिअर प्यावी? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

- चहामध्ये दूध घालून पिऊ नये. यामुळे चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट कमी होते. चहामध्ये दूध घालू नये आणि काळा चहा प्यावा, असेही अनेक संशोधनांमध्ये म्हटले आहे.

- चहामध्ये दूध घालून प्यायल्याने चहामधील पॉलीफेनॉल्स असरदार ठरत नाही. त्यामुळे चहासोबत कोणतेही दुग्धजन्य पदार्थ खाऊ नये.

- चहासोबत खारट किंवा इतर स्नॅक्सचे सेवन करणेही शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. फायबर किंवा प्रथिने जास्त असलेले अन्न देखील कॅफिनचे शोषण कमी करू शकतात. यामुळे स्ट्रेस वाढते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स