बिघडलेली जीवनशैलीमुळे सध्या गंभीर आजारांचा धोका वाढत चालला आहे. मधुमेह, ब्लड शुगर, लठ्ठपणा यासह बॅड कोलेस्टेरॉलची समस्या वाढत चालली आहे. वाढत्या कोलेस्टेरॉलवर वेळेवर नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. अन्यथा गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे हृदयाच्या निगडीत समस्या वाढत जातात. शिवाय नसा ब्लॉक होतात. ज्यामुळे शरीरात ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळे येतात (Bad Cholesterol).
शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची समस्या वाढत असेल तर उत्तम डाएट आणि हिरव्या पानांचा आहारात समावेश करा (Health Tips). या हिरव्या पानांचा आहारात समावेश केल्याने रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल. शिवाय आरोग्य सुधारेल(Foods To Help Lower LDL ('Bad') Cholesterol).
कडीपत्ता
बरेच जण कडीपत्त्याचा वापर फक्त फोडणीसाठी करतात. पण याच्या सेवनाने आरोग्य, स्किन आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरते. मुख्य म्हणजे कडीपत्त्यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. याचा वापर आपण फोडणीमध्ये करू शकता. किंवा सकाळी कडीपत्त्याची ज्यूस तयार करून पिऊ शकता.
कोथिंबीर
उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते. कोथिंबीरीमध्ये कॅरोटीनॉइड आढळते. यासह अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. अँटिऑक्सिडंट पदार्थ शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे धोके कमी करतात. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कोथिंबीरीचा वापर आपण प्रत्येक पदार्थात करू शकता. किंवा कोथिंबीरीच्या चटणीचा आहारात समावेश करू शकता.
हुशारी वाढेल म्हणून जास्त बदाम खाऊ नका! 'अति तेथे माती' होईल आणि बिघडेल तब्येत..
मेथीची पानं
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण मेथीच्या पानांचा वापर करू शकता. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे उच्च कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. शिवाय वेट लॉस आणि इतर गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. आपण मेथीच्या पानांचा वापर भाजी, कोशिंबीर, आणि इतर पदार्थांसाठी करू शकता.
बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल
तुळशीची पानं
तुळशीच्या पानातील पौष्टीक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुळशीच्या पानात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुळशीची पानं धुवून सुकवून घ्या, व तुळशीची पावडर उकळत्या पाण्यात मिसळून प्या.