Join us   

रोज खा ४ पैकी १ पदार्थ, चष्मा लागणार नाही-डोळ्यांचा नंबर वाढण्यापूर्वी व्हा जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 7:01 PM

Foods to Improve Eyesight Without Glasses : नजर तेज करण्यासाठी आहारात हवेतच ४ पदार्थ

सध्या लोकांमध्ये स्क्रीन टायमिंगचे प्रमाण वाढले आहे (Eye care Tips). कामामुळे लोकांना लॅपटॉप किंवा संगणकावर तासंतास स्क्रीनसमोर बसून काम करावे लागते. ज्यामुळे डोळ्यांचे विकार वाढतात (Foods for Eyes). शिवाय नजर देखील कमजोर होते. कधीकधी तासभर स्क्रीन पाहण्याने डोळ्यात पाणी येते. याशिवाय डोळेही थकलेले दिसतात.

८ तास स्क्रीनसमोर काम केल्याने डोळ्यांना विश्रांती मिळत नाही. ज्यामुळे चष्म्याचा नंबर वाढतो किंवा ज्यांना चष्मा नाही त्यांची नजर धूसर होत जाते. डोळ्यांची नजर साफ आणि तेज करण्यासाठी आपण काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. याने नक्कीच फरक दिसेल(Foods to Improve Eyesight Without Glasses).

डोळ्यांसाठी कोणते पदार्थ बेस्ट

बदाम

डायटीशियन मनप्रीत यांनी सांगितले की, बदाम डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. रोज सकाळी भिजलेले ५ बदाम खावेत. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात. जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. आपण संत्री देखील खाऊ शकता. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे ज्यामुळे डोळ्यांजवळील रक्तवाहिन्या निरोगी राहतात.

आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी

गाजर

गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन दृष्टी सुधारण्यासाठी मदत करते.  रेटिनाच्या वाढीस मदत करते. जर आपली दृष्टी कमकुवत होत असेल तर, आहारात गाजराचा समावेश करा. गाजरात असलेले व्हिटॅमिन सी मॅक्युलर डिजेनेरेशन कमी करून डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते.

आवळा

तीक्ष्ण दृष्टीसाठी आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते.

२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..

किवी

किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असतात. जे डोळ्यांचे रक्षण करते. शिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. याचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे इम्युनिटीही बुस्ट होते, आणि डोळ्यांच्या निगडीत आजार दूर राहतात.

टॅग्स : डोळ्यांची निगाहेल्थ टिप्स