Join us   

दाताला ब्रेसेस लावल्या? ४ गोष्टी खाणं टाळा; दात किडतील - दुखणं वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 4:58 PM

Foods You Can and Shouldn't Eat If You Have Braces : दातांवर डेण्टल ब्रेसेस बसवल्यानंतर कशी काळजी घ्याल?

अनेकांचे दुधाचे दात पडल्यानंतर वाकडे - तिकडे येतात (Braces). ज्यामुळे चेहऱ्याचा लूक काहीसा खराब होतो. दुधाचे दात पडल्यानंतर आपले दात योग्य जागी आणि सरळ यावे असे सगळ्यांना वाटते (Teeth problem). पण दात सरळ न आल्यास दातांना तार म्हणजेच ब्रेसेस लावले जातात (Oral health). काही जण डेण्टिस्टकडे जाऊन दातांना तार लावतात.

पण दातांना तार लावल्यानंतर दातांची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः आहाराकडे लक्ष द्यायला हवे. दातांना ब्रेसेस लावल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? कोणते पदार्थ खाणं टाळावे?(Foods You Can and Shouldn't Eat If You Have Braces).

कडक आणि चिकट पदार्थ खाणं टाळावे

दातांना तार बसवल्यानंतर नट्स, पॉपकोर्न आणि बर्फाचे तुकडे खाणं टाळावे. शक्यतो चिकट पदार्थ खाणं टाळावे. तसेच च्युइंगम, कारमेल, चॉकलेट आणि टॉफीसारखे चिकट पदार्थ टाळा. कारण यामुळे ब्रेसेस खराब होऊ शकतात. शिवाय दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात.

काजू - बदाम सोडा; मुठभर स्वयंपाकघरातली १ गोष्ट खा; ताकद - उर्जा वाढेल; वजनही घटेल

फळे आणि भाज्या कापून खा

फळे आणि भाज्या खाताना शक्यतो कापून, लहान तुकडे करून खावे. जेणेकरून फळे आणि भाज्या खाणं सोपं होईल. शिवाय ब्रेसीसवर अतिरिक्त दबावही पडणार नाही.

सोडा पेय टाळा

दातांवर ब्रेसीस लावल्यानंतर  सोडा आणि साखरयुक्त पेय पिणे शक्यतो टाळा. कारण यामुळे दात किडण्याची शक्यता जास्त असते. शिवाय ब्रेसेसभोवती प्लेकची समस्या वाढू शकतात.

श्रीराम नेने सांगतात खा ६ पदार्थ; प्रोटीनचा खजिना- वाढतील मसल्स - मिळेल ताकद

स्वच्छतेकडे लक्ष द्या

दातांवरील ब्रेसीसची काळजी घेताना निष्काळजीपणा टाळा. नियमित दातांची स्वच्छता राखा. कारण दातांवर तार बसवल्यानंतर बॅक्टेरियाचा धोका अधिक वाढतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य