Join us   

चुकूनही शिजवून खाऊ नयेत असे ५ पदार्थ, न्यूट्रिशन जातं उडून- पोटासाठीही त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 6:33 PM

Foods You Should Eat Raw, Not Cooked काय-किती शिजवून खावं याचं एक गणित असतं, ते चुकलं की पोषण गायब

सध्या लोकं कोणत्याही पदार्थासह विरुद्ध गोष्टी मिक्स करून खातात. काही पदार्थ टेस्टी लागतात. तर काही आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. योग्य फूड कॉम्बिनेशन माहित असणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते, तर काही गोष्टी एकत्र केल्याने अन्न विषारी होऊ शकते. आपण ऐकलं असेल की, पदार्थ जास्त शिजवल्याने त्यामधील पोषक घटक नष्ट होतात. यासह असे देखील काही पदार्थ आहेत, जे जास्त शिजवल्याने आरोग्यासाठी विषारी ठरतात.

यासंदर्भात पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, ''काही गोष्टी कच्च्या चवीला चांगल्या असतात, तर काही पदार्थ जास्त शिजवल्यानंतर आरोग्यासाठी हानीकारक ठरतात. काही पदार्थांचे पौष्टीक तत्वे कमी होतात, तर काही पदार्थ अतिप्रमाणात शिजवल्याने आरोग्यासाठी विषारी बनतात''(Foods You Should Eat Raw, Not Cooked).

मध

साखरेऐवजी मध खाण्याचा सल्ला मिळतो. कच्च्या मधामध्ये साखर, पाणी, बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्वे सी, बी, डी, ई आणि के व अनेक आवश्यक खनिजे आढळतात. मध गरम केल्याने त्याची गुणवत्ता खराब होते, यासह एंजाइम कमी होतात.  मध गरम करून खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते.

रात्री झोपताना दूध प्यावं का? कुणी आणि किती प्यावं? तज्ज्ञ सांगतात, दूध का दूध..

ब्रोकोली

ब्रोकोलीची भाजी करणे टाळावे. ब्रोकोली कच्ची खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात, ब्रोकोली शिजवून खाल्ल्याने त्यातील व्हिटॅमिन सी आणि फोलेट यांसारखे गुणधर्म पाण्यात विरघळतात.

बदाम

बदाम हे सुपरफूड मानले जाते. बदाम कधीही भाजून खाऊ नये. त्यात असलेली हेल्दी पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स खराब होतात. बदाम खाताना ते भिजवून खा. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

औषधे घेता पण बरंच वाटत नाही? औषधं नियमित घेण्याचे ४ नियम, नाहीतर डॉक्टर तरी काय करणार..

ढोबळी मिरची

सिमला मिरची एक अशी भाजी आहे, जी जास्त शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे अति शिजवल्याने नष्ट होते.

बीटरूट

बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि इतर अनेक पौष्टीक घटक आढळतात. बीटरूट अतिप्रमाणात शिजवल्याने त्यातील पौष्टीक घटक नष्ट होतात. यामुळेच तज्ज्ञ बीटरूट कच्ची खाण्याचा सल्ला देतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सअन्न