ॲसिडीटी अशावेळी होते जेव्हा शरीरात पुरेश्या प्रमाणातत ॲसिड तयार होत नाही. याचं काम खाल्लेल्या अन्नाचं पचन करणं हे असते. (Instant solution of acidity) ॲसिड कमी प्रमाणात तयार झाल्यास खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि ॲसिडीचा त्रास वाढतो. (Acidity vr gharguti upay)ही सामान्य समस्या असली तरी आरोग्याच्या इतर गंभीर समस्या यामुळे उद्भवू शकतात.
ॲसिडीटीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. (Four Quick Remedies to Get Rid of Acidity at Home) काहीजण असा त्रास उद्भवल्यास गोळ्या घेऊन पटकन आराम मिळवण्याचा प्रयत्न करतात पण वारंवार गोळ्या घेतल्याने किडीनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
थंड दूध प्या
छातीत जळजळ झाल्यास थंड दूध पिणं हा उत्तम उपाय आहे. थंड दूध प्यायल्याने त्वरीत ॲसिडीटीपासून आराम मिळतो. दूधात कॅल्शियम असते. जे पोटात ॲसिड तयार होण्यापासून रोखते. यामुळे पोटातील जळजळ आणि वेदना कमी होतात. थंड दूध प्यायल्याने हा त्रास कमी होतो आणि आराम मिळतो म्हणूनच ॲसिडिटीवर सोपा उपाय म्हणून थंड दूधाचे सेवन करायला हवे.
ओवा
ओवा पोटाच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर मानला जातो. यात एंजाईम्स आणि रसायनं असतात जे पोटाशी संबंधित समस्याांना दूर ठेवण्यास मदत करतात. ओव्यातील सक्रिय एंजाईम्स आणि रसायनं पोटाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करतात. पोटातील आम्लाचा प्रभाव यामुळे कमी होतो आणि पोट शांत राहण्यास मदत होते. ओवा ॲसिड रिफ्लेक्स यांसारख्या समस्या टाळण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी साहाय्यक ठरतो.
दूध न पिता कॅल्शियम कसं मिळेल? दुप्पट कॅल्शियम असलेले ८ पदार्थ खा-२०६ हाडं होतील मजबूत
व्हिनेगर
एप्पल सायडर व्हिनेगरमध्ये मॅलिक एसिड असते. ज्यामुळे छातीतील जळजळ नियंत्रणात राहण्यास मदत होते. पोटात एसिडचा स्त्राव कमी करून न्युट्रिलाईज करता येतो. एप्पल साडर व्हिनेगर पाण्यात मिसळून प्यायल्याने ॲसिडीटीचा त्रास कमी होतो. यात प्रोबायोटिक्स असतात ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. रोज या पाण्याचे सेवन केल्यास या त्रासावर नियंत्रणा मिळवता येते.
पोटभर भात खा-कणभरही वजन वाढणार नाही; तांदूळ 'या' ३ पद्धतीने शिजवा, पोट राहील स्लिम
तुळशीची पानं
तुळशीच्या पानांत जीवाणूरोधी आणि एंटी ऑक्सिडेंट्सयुक्त गुण असतात ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे पोटातील ॲसिडचा प्रभाव कमी होतो आणि पोट शांत राहते. तुळशीची पानं वाटून पाण्याबरोबर प्यायल्याने एसिडीटीचा त्रास टळतो. नियमित याचे सेवन केल्याने ॲसिडिववर नियंत्रण मिळते.