Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ओटीपोट, मांड्यांचे फॅट कमी होत नाही? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भराभर वजन कमी होईल

ओटीपोट, मांड्यांचे फॅट कमी होत नाही? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भराभर वजन कमी होईल

Weight Loss Tips By Baba Ramdev Baba : रात्री १ चमचा त्रिफळा गरम पाण्यासोबत घ्या, त्रिफळा डायजेशन चांगले करण्यासाठी फायदेशीर ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 11:50 AM2024-06-09T11:50:03+5:302024-06-10T14:22:21+5:30

Weight Loss Tips By Baba Ramdev Baba : रात्री १ चमचा त्रिफळा गरम पाण्यासोबत घ्या, त्रिफळा डायजेशन चांगले करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Fruitarian Diet Reduces Obesity Know From Baba Ramdev How This Healthy Diet Will Reduce Weight | ओटीपोट, मांड्यांचे फॅट कमी होत नाही? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भराभर वजन कमी होईल

ओटीपोट, मांड्यांचे फॅट कमी होत नाही? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भराभर वजन कमी होईल

 देशभरातील अनेक लोकांना लठ्ठपणाच्या  त्रासाचा सामना करावा लागत आहे. डायबिटीज कॅपिटल बनलेल्या देशात १०० पैकी ११ लोकांना कॅन्सरचा धोका आहे. हार्ट अटॅकमुळे अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. (Ramdev baba Weight Loss Tips) थायरॉईड, फॅटी लिव्हर, किडनी प्रोब्लेम, आर्थरायटीसच्या  रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हे आजार नॉन कम्यूनिकेबल आहेत ज्यांचा  व्हायरल बॅक्टेरिअल इन्फेक्शनशी काहीही संबंध नाही जे लाईफस्टाईलशी निगडीत आजार आहेत. (Fruitarian Diet Reduces Obesity Know From Baba Ramdev How This Healthy Diet Will Reduce Weight)

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार १० पैकी ८ लोक ओबेसिटीच्या जाळ्यात अडकले आहेत. सॅच्युरेडेट फॅट्स मांसाहारी पदार्थांमध्ये सर्वात जास्त असतात. युनाईटेड नेशननेसुद्धा आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. डाएटमध्ये फायबर्सची कमतरता भासल्यास आतडे खराब होतात. पोटात एसिडीटी वाढल्यामुळे बोन्स ज्वाईंट्सशी संबंधित समस्या वाढतात.

हेल्थ एक्सपर्ट्स फ्रुटेरियन डाएटचा सल्ला देतात. वेगवेगळ्या रंगाची फळं, भाज्या आणि लिक्विड अशा पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकतात.  ज्यात ८० ते ९० टक्के पाणी असते. यात भूक लागणारे हॉर्मोन्स जास्त एक्टिव्ह नसतात ज्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. योगगुरू बाबा  रामदेव यांनी हेल्दी डाएटशिवाय वजन  कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत. 

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

लाईफस्टाईल कशी बदलायची?

वजन वाढू देऊ नका, वेळेवर झोपा, जवळपास ८ तासांची झोप घ्या,  बीपी- शुगर वेळोवेळी तपासत राहा, व्यवस्थित वर्कआऊट करा, नियमित मेडिटेशन करा.

लठ्ठपणाची कारणं

चुकिची लाईफस्टाईल, फास्टफूड, कार्बोनेडेट ड्रिंक्स, मानसिक ताण-तणाव, वर्कआऊटची कमतरता, औषधांचा साईड इफेक्ट, झोपेची कमतरता.

पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन

लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय

1) सगळ्यात आधी लिंबू पाणी प्या,  दुधीचा ज्यूस प्या, जेवणाच्या आधी सॅलेड खा, रात्री चपाती किंवा भात खाणं टाळा.

2) रात्री ७ च्या आधी  रात्रीचं जेवण करा, जेवणाच्या १ तासानंतर पाणी प्या.  वजन नियंत्रणात राहील- जीवनात बदल करा. रामदेव बाबा सांगतात लिफ्टऐवजी शिड्यांचा वापर करा, सतत चहा-कॉफीचे सेवन करू  नका, भूक लागल्यानंतर पाणी प्या, खाण्यात आणि झोपण्याच्या वेळेत ३ तासांचे अंतर ठेवा.

3) रात्री १ चमचा त्रिफळा गरम पाण्यासोबत घ्या, त्रिफळा डायजेशन चांगले करण्यासाठी फायदेशीर ठरते, वजन कमी होते. ३ ते ६ ग्राम दालचिनी घ्या, २०० ग्राम पाण्यात उकळून घ्या त्यात १ चमचा मध मिसळून याचे सेवन करा. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगाने होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. 

Web Title: Fruitarian Diet Reduces Obesity Know From Baba Ramdev How This Healthy Diet Will Reduce Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.