Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुम्ही पाण्याची बाटली नाही आजारपण विकत घेताय! FSSAI चा अहवाल, हाय रिस्क इशारा, सावधान..

तुम्ही पाण्याची बाटली नाही आजारपण विकत घेताय! FSSAI चा अहवाल, हाय रिस्क इशारा, सावधान..

Food Safety and Standards Authority of India (FSSAI): आपण शुद्ध म्हणून जे पाणी सतत पित आहोत ते बाटलीबंद मिनरल वॉटर 'High Risk Food' या प्रकारात येतं, असा अहवाला फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI यांनी नुकताच दिला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2024 12:11 PM2024-12-05T12:11:30+5:302024-12-05T12:12:40+5:30

Food Safety and Standards Authority of India (FSSAI): आपण शुद्ध म्हणून जे पाणी सतत पित आहोत ते बाटलीबंद मिनरल वॉटर 'High Risk Food' या प्रकारात येतं, असा अहवाला फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI यांनी नुकताच दिला आहे.

FSSAI has now decided to treat all packaged drinking and mineral water in the ‘high risk’ category | तुम्ही पाण्याची बाटली नाही आजारपण विकत घेताय! FSSAI चा अहवाल, हाय रिस्क इशारा, सावधान..

तुम्ही पाण्याची बाटली नाही आजारपण विकत घेताय! FSSAI चा अहवाल, हाय रिस्क इशारा, सावधान..

Highlightsबाटलीबंद मिनरल वॉटरची गुणवत्ता सुधारण्यात यावी आणि अधिक शुद्ध पाणी ग्राहकांपर्यंत जावे, यासाठी असे निर्णय घेण्यात आले आहे.

पुर्वी प्रवासासाठी जेव्हा लोक घरातून बाहेर पडायचे तेव्हा त्यांच्यासोबत पिण्याच्या पाण्याची बाटली हमखास असायचीच. कारण आजच्यासारखी पाणी विकत मिळण्याची परिस्थिती तेव्हा नव्हती. बाहेर मिळणाऱ्या पाण्यापेक्षा घरचंच पाणी सुरक्षित आणि शुद्ध आहे, असा लोकांचा विश्वास असायचा. त्यामुळे आठवणीने पाण्याची बाटली सोबत ठेवलीच जायची. पण आता मात्र घराबाहेर पडताना खूपच कमी लोक घरच्या पाण्याची बाटली सोबत ठेवतात. कारण पाणी विकत मिळतं आणि ते खूप शुद्ध असतं, अशी आपली धारणा आहे. त्यामुळे सर्रास आपण बाटलीबंद पाणी घेतो आणि डोळे झाकून पितो. पण शुद्ध समजून जे पाणी पित आहोत तेच पाणी हाय रिस्क फूड या प्रकारात मोडत आहेए असा अहवाल एफएसएसएआय यांनी दिला आहे.(FSSAI has now decided to treat all packaged drinking and mineral water in the ‘high risk’ category)

 

बाटलीबंद पाणी आहे हाय रिस्क फूड

देशभरात तयार होणाऱ्या अनेक पॅकबंद अन्नपदार्थांना ब्युराे ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड Bureau of Indian Standards (BIS) यांच्यावतीने त्या पदार्थांच्या सुरक्षेविषयी प्रमाणपत्र देण्यात येतं.

'हा' पदार्थ घ्या आणि दिवसातून एकदा चेहऱ्याला लावा! ७ दिवसांत दिसेल लक्षणीय बदल- त्वचा चमकेल

काही दिवसांपुर्वी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड यांच्या यादीतून बाटलीबंद मिनरल वॉटर वगळण्यात आलं होतं. त्यामुळे एफएसएसएआयने बाटलीबंद पाण्याला हाय रिस्क फूड कॅटेगिरी या प्रकारात टाकले आहे. त्यानुसार आता बाटलीबंद पाण्याचे परिक्षण केले जाणार असून त्याच्या सुरक्षेविषयी ऑडीट सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.


 

FSSAI ने घेतलेल्या या निर्णयानंतर आता मिनरल वॉटर उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचे दरवर्षी रिस्क बेस इन्स्पेक्शन करून घ्यावे लागणार आहे.

या हिवाळ्यात अभिनेत्री भाग्यश्रीच्या रेसिपीने डिंकाचे लाडू करून पाहा - बघा एकदम खास रेसिपी 

तसेच त्यांना दिलेला परवाना आणि रजिस्ट्रेशन यांचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागणार आहे. बाटलीबंद मिनरल वॉटरची गुणवत्ता सुधारण्यात यावी आणि अधिक शुद्ध पाणी ग्राहकांपर्यंत जावे, यासाठी असे निर्णय घेण्यात आले आहे.

 

Web Title: FSSAI has now decided to treat all packaged drinking and mineral water in the ‘high risk’ category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.