'खा तूप येईल रूप' ही म्हण तर आपण ऐकलीच असेल (Adulteration in ghee). तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ए मुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते (FSSAI). रिफाइंड तेलाऐवजी तुपाचा वापर आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. पण सध्या बाजारात भेसळयुक्त तुपाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. नकली तूप खाल्ल्याने अनेक आजार आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुजरातच्या अन्न आणि औषध नियंत्रण प्रशासनाने नवसारीमधून ३००० किलो बनावट तूप जप्त केले आहे. या तुपात भेसळयुक्त पामोलिन तेल मिक्स करण्यात आले होते. याच्या काही दिवसांपूर्वी जयपूरमध्येही बनावट तूप जप्त करण्यात आले होते. भेसळयुक्त तुपाचे दुष्परिणाम शरीराला सहन करावे लागते. त्यामुळे बाजारातून तूप विकत घेताना काही गोष्टी लक्षात ठेवा. नकली आणि असली तुपामध्ये फरक ओळखा(FSSAI releases new method to detect adulteration in ghee).
पामोलिन तेलाचे सेवन करण्याचे तोटे
पामोलिन तेलाला पाम तेल म्हणतात. हे तेल काही भागात सर्वाधिक वापरले जाते. या तेलाला हृदयविकाराचे कारण मानले जाते. या तेलामुळे हृदयविकाराच्या निगडीत आजार होऊ शकतात. त्यात सुमारे ५० टक्के सॅच्युरेटेड फॅट असते. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.
घरगुती तूप बेस्ट
घरगुती तूप आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यात कोणत्याही प्रकारचे घातक तेल किंवा रसायन मिसळले जात नाही. साय साठवून, तूप कढवले जाते. हे तूप अधिक दिवस आरामात टिकते.
बनावट तूप कसे ओळखावे?
गव्हाची पोळी आणि प्रोटीनरिच? कणकेत मिसळा १ खास पदार्थ, पोळी खाऊनही घटेल वजन
- तुपातील पाम तेलाची भेसळ शोधण्यासाठी FSSAIने एक युक्ती शेअर केली आहे.
- दोन कपमध्ये तूप घ्या.
- आता त्यात 1ml फेरिक क्लोराईड आणि 0.3ml पोटॅशिअम फेरीसायनाइड रसायन घालून मिक्स करा.
- शुद्ध तुपाचा रंग हिरवा, तर भेसळयुक्त तुपाचा रंग निळा होईल.
तुपामध्ये स्टार्चची भेसळ
- तुपामध्ये स्टार्च मिक्स केले जाते.
- तुपामध्ये स्टार्चचं भेसळ आहे की नाही हे ओळखण्यासाठी, एका बाऊलमध्ये तूप घ्या. त्यात २ ते ३ थेंब आयोडीन टिंक्चरचे मिक्स करा.
- जर तुपामध्ये भेसळ असेल तर, त्याचा रंग निळा होईल.
बनावट तूप ओळखण्याची सोपी पद्धत
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बनावट तूप रसायने न घालताही ओळखले जाऊ शकते. १ टीस्पून देसी तूप गरम करा. खऱ्या तुपाचा रंग तपकिरी होऊ लागेल. जर त्यात भेसळ असेल तर, तूप वितळण्यास वेळ लागेल, आणि तुपाचा रंग हल्का पिवळा होईल.
शुद्ध तूप खाण्याचे फायदे
- गुड कोलेस्टेरॉल वाढते
- रोगप्रतिकारशक्ती वाढते
अनुष्का शेट्टीला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार; उगाचच हसण्याचा हा आजार नेमका असतो काय?
- अनेक जीवनसत्त्वे मिळतात
- उर्जा वाढते
- मेंदूची कार्यक्षमता वाढते
- त्वचा मुलायम आणि केस मजबूत होतात.