Join us   

FSSAI म्हणते 'या' पिठाच्या चपात्या खा; बीपीही नॉर्मल आणि हाडंही होतील मजबूत! पाहा कोणतं ते पीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 2:40 PM

Fssai share to eat fortified wheat chapati-best for Health : गव्हाच्या पिठाच्या चपात्या आपण रोज खातो, पण गव्हाचे पीठ विकत घेताना '१' गोष्ट लक्षात ठेवा..

उत्तम आरोग्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करायलाच हवा (Health Tips). धान्य, कडधान्य, फळे, भाज्या यासह इतर पौष्टीक पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. रोजच्या आहारात आपण गव्हाचं, ज्वारीचं किंवा नाचणीच्या पिठाचा समावेश करतो. गहू हे सर्वात जास्त वापरले जाणारे धान्य आहे. जवळपास सर्व घरांमध्ये गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्या जातात. पण गहू या धान्यातून आपल्या शरीराला पोषण मिळावे असं वाटत असेल तर, फोर्टिफाइड गव्हाचा आहारात समावेश करा.

एफएसएसएआयनुसार (FSSAI), 'गहू आणि तांदूळ यासह अनेक धान्यांना फोर्टिफाइड केले जाऊ शकते. यामुळे त्यातील पौष्टीक घटक आणखीन वाढतील. यामुळे पीठामधून आणखीन पौष्टीक घटक वाढू शकते. ज्यामुळे शरीराला धान्यातून पुरेपूर पोषण मिळेल. शिवाय आरोग्यही सुदृढ राहील.' पण गव्ह्याच्या पीठातील गुणधर्म कसे वाढवता येऊ शकते? पाहूयात(Fssai share to eat fortified wheat chapati-best for Health).

गव्हाच्या पीठाला फोर्टिफाइड कसे करावे?

व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी

सामान्य पीठ अधिक पौष्टिक बनवण्यासाठी, त्यात लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी १२ सारखे इतर पोषक घटक जोडले जातात. जेव्हा गहू दळून पीठ बनवले जाते तेव्हा ही संपूर्ण प्रक्रिया होते.

फोर्टिफाइड गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाण्याचे फायदे

- गव्हाच्या पिठाला फोर्टिफाइड केल्याने त्यातील पोषक घटकांचे प्रमाण वाढते. लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी 12 सारखे आवश्यक पोषक घटक त्यात मिसळले जातात, या पिठापासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने शरीराला पुरेपूर उर्जा मिळते. तसेच शरीराला ताकद मिळते आणि थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.

- गव्हाच्या पिठात लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी १२ असते. जे ॲनिमियाशी लढण्यासाठी आणि रक्त तयार करण्यासाठी आवश्यक असतात. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनही सुरळीत होते.

- यासह फोर्टिफाइड गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने हाडं मजबूत होतात.

किलोभर लसूण सोलण्याची युनिक ट्रिक! फक्त अर्धा चमचा बेकिंग सोड्याचा वापर कसा करावा, पाहा..

फोर्टिफाइड गव्हाचे पीठ आपल्याला कुठे मिळेल?

जर आपल्याला कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर आपण आपल्या आहारात फोर्टिफाइड पिठाचा समावेश करायला हवा. हे पीठ आपल्याला कुठल्याही दुकानात सहज मिळेल. त्याच्या पॅकेटवर 'F+' लिहिलेले असते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य