Join us   

डिटॉक्स करण्यासाठी महागडे उपाय कशाला, १ रुपयाही खर्च न करता करा १ सोपा उपाय-व्हा फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:25 AM

Full Body Detox : शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

इम्यूनिटी (Immunity)वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले जाता. इम्यूनिटी वाढवण्यासाठी  एक योग्य रुटीन सेट होणं गरजेचं असतं. (Weight Loss Tips) यात आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला हवी. या सगळ्यात आपल्या लाईफस्टाईलची महत्वाची भूमिका असते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Easy Ways To Detox Body Foods That Boost Immunity)

शरीर डिटॉक्स करण्याचे उपाय (How to detox Body)

1) हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार नेहमी ७ ते ८ तासांची झोप घ्या आणि लवकर बेडवर जा. झोप पूर्ण झाल्यानंतरच उठा. यामुळे तुम्हाला पूर्णपणे फ्रेश वाटेल. शरीर रिलॅक्स राहील आणि इम्यूनिटी वाढण्यासही मदत होईल. नाश्ता  करा किंवा जेवण प्रत्येक घास हा १५ ते २० वेळा चावून खा.

2)  मसाज करा. आपल्या आवडीची गाणी ऐका.  ज्यामुळे ताण-तणाव कमी होईल आणि डोकं रिलॅक्स वाटेल. कुटुंबाच्या सदस्यांना वेळ द्या. त्यांचं म्हणणे ऐकून घ्या. ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

3) शरीर मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम आणि फिजिकल एक्टिव्हीजचा महत्वाचा रोल असतो. रोज ४५ मनिटं  फिजिकल एक्टिव्हिटीज केल्याने फॅटी लिव्हरची समस्या उद्भवत नाही. रोज प्राणायम करा. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.

4) साधं पाणी प्या किंवा कोमट पाणी प्या. हिवाळ्यात नेहमी कोमट पाणी प्यायला हवं. मीठ, साखर न घालता लिंबू पाण्याचे सेवन करा. लिंबू पाणी आणि गूळाचे सेवन तुम्ही करू शकता.

5) शरीर डिटॉक्स करण्यासाठी पाणी आणि हळदीचे कॉम्बिनेशन्स उत्तम ठरते. एक ग्लास पाणी उकळून घ्या. त्यानंतर यात १ चमचा हळद घाला ते २ मिनिटं उकळून  घ्या. नंतर गाळून या कोमट पाण्याचे सेवन करा. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.

जेवणाच्या ताटात प्लेटचा अर्धा भाग फ्रुट्स, सॅलेड, भाज्या असायला हव्यात. यात कार्बोहायड्रेट्स असावेत. प्रोटीनसाठी तुम्ही पनीर, डाळी, दही खाऊ शकता. याशिवाय  जास्त तेलातील भाज्या खाऊ नका. तुम्ही जे  काही खात  असाल तर त्यात तेलाचे आणि तूपाचे प्रमाण कमी असावे. 

टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य