भारतीय अन्न पदार्थात लसणाचा वापर होतोच. फोडणीसाठी लसूण हा हमखास वापरला जातो. फोडणीमध्ये लसूण नसेल तर, पदार्थाची चव बिघडते. पदार्थात लसूण टाकताच पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. काहींना लसूण खायला आवडत नाही. ते पदार्थातून लसूण वगळून काढतात. आरोग्यासाठी लसूण खूप फायदेशीर ठरते. लसूण कच्चा चावून खाल्ल्याने याचे अधिक फायदे आरोग्याला मिळतात.
यासंदर्भात, पोषण तज्ज्ञ निखिल वत्स सांगतात, ''लसणातील प्रमुख पोषक घटक अॅलिसिन आहे. अॅलिसिन शिवाय लसणात अँटी फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात. त्यात असलेले फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, रिबोफ्लेविन, थायामिन आणि नियासिन हे पोषक घटकही शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. लसूण सकाळी रिकाम्या पोटी खाणे आवश्यक आहे, याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात''(Garlic On An Empty Stomach Health Benefits).
रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
डायबिटिजग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त
लसणामध्ये अॅलिसिन नावाचे एक संयुग असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 4 पाकळ्या खाव्यात.
गरोदरपणानंतर १० दिवसात १० किलो वजन कमी? गौहर खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, फोटो व्हायरल..
अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत
दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्या चावून खावे. यामुळे शरीरातील अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होईल. त्यातील अँटी-हायपरलिपिडेमिया गुणधर्मामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते.
सर्दी - खोकला, तापाचा त्रास होतो कमी
सर्दी-खोकला, तापाचा त्रास झाल्यानंतर, आपली आई किंवा आजी घरगुती उपाय म्हणून लसूण खाण्याचा सल्ला देतात. लसणामध्ये अॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. यासह रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यास मदत करते.
अपचन-गॅसेस यामुळेही डोके प्रचंड दुखते? ५ उपाय, पोट होईल साफ-डोकेदुखीही थांबेल..
त्वचेसाठी फायदेशीर
काही जणांच्या चेहऱ्यावर खूप कमी वयातच सुरकुत्या दिसू लागतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये लसणाचा समावेश केल्यास सुरकुत्यांपासून सुटका होऊ शकते. व त्वचेवर नैसर्गिक चमक येऊ शकते.